nitesh arne on bjp | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

सिंधुदुर्गात अदृश्‍य कमळाची कमाल : नितेश राणे 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

भाजपाच्या वाटेवर असलेल्या आमदार नितेश राणे यांनी जिल्हा भाजपाला थेट मैत्रीपुर्ण सल्ला दिला आहे. भाजपाला जिल्ह्यात चांगले दिवस येवू शकतात; परंतु त्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पक्षाचे विमान टेक ऑफ करण्यासाठी को पायलट बदलावा, अशी सूचना त्यांनी केली आहे. तसेच जिल्हा नियोजन निवडणुकीत कॉंग्रेसला मिळालेले यश म्हणजे अदृश्‍य कमळाचीच कमाल आहे, असा दावा ही राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : भाजपाच्या वाटेवर असलेल्या आमदार नितेश राणे यांनी जिल्हा भाजपाला थेट मैत्रीपुर्ण सल्ला दिला आहे. भाजपाला जिल्ह्यात चांगले दिवस येवू शकतात; परंतु त्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पक्षाचे विमान टेक ऑफ करण्यासाठी को पायलट बदलावा, अशी सूचना त्यांनी केली आहे. तसेच जिल्हा नियोजन निवडणुकीत कॉंग्रेसला मिळालेले यश म्हणजे अदृश्‍य कमळाचीच कमाल आहे, असा दावा ही राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. 

श्री राणे यांचा भाजपा प्रवेश आता निश्‍चित मानला जात आहे. नियोजनच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर श्री. राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपाच्या नेत्यांचे तोंडभरुन कौतुक केले. यावेळी श्री. राणे म्हणाले, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे पक्ष वाढविण्यासाठी काम करीत असताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जावून टीका केली. त्याचा वचपा काढण्यासाठी नाराज झालेल्या भाजपा कार्यकर्त्यानी अदृश्‍य रुपाने कॉंग्रेसला मदत केली. त्यामुळे केसरकरांच्या उमेदवारांना धक्का देत याठिकाणी कॉंग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत, ही वस्तूस्थिती आहे.

श्री. राणे पुढे म्हणाले, जिल्ह्यात भाजपा वाढविण्यासाठी श्री. चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार प्रयत्न करीत आहे; परंतु त्यांच विमान म्हणावे तसे अद्याप टेक ऑफ झालेले नाही. त्यामुळे श्री. जठार यांना आपण मैत्रीत्वाचा एक सल्ला देत आहे. त्यांनी आपले विमान उडविण्यासाठी को पायलट बदलावा पक्षाला निश्‍चितच यश मिळेल.

यावेळी त्यांनी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या टिकेचा समाचार घेतला. श्री. नाईक यांनी राणेंच्या दोन्ही मुलामुळे राणेंचे नुकसान झाले आहे, अशी टीका केली होती. जिल्ह्यात आणि राज्यातील परिस्थिती लक्षात घेता राणेंच्या दोन्ही मुलांमुळे राणेंचा आणि त्यांचा मुलांचा फायदा झाला आहे, ही वस्तूस्थिती आहे. त्याची काळजी नाईक यांनी करुन नये. त्यांच्या सारखी पक्षाची पदे, कंत्राटे आम्ही आमच्याच नातेवाईकांना दिली नाहीत. त्यामुळे राणेंवर बोलण्याची त्यांना नैतिकता नाही, असे श्री. राणे म्हणाले. 

श्री. राणे म्हणाले, जिल्ह्यात आज झालेला कॉंग्रेसचा विजय लक्षात घेता पालकमंत्री केसरकरांवर आता त्यांच्या सहकारी नगरसेवकांना विश्‍वास राहीलेला नाही. त्यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे नगराध्यक्ष बबन साळगावकर हे राणे मंत्री झाले तर मला आनंद होईल, असे विधान करतात. याचा अर्थ केसरकरांनी समजून घ्यावे. आपण कार्यकर्त्यात विश्‍वास निर्माण करू शकलो नाही, याचे आत्मचिंतन करावे.

संबंधित लेख