Nirupam to meet Rahul Gandhi | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

पराभवानंतरही निरुपम यांना हायकमांडकडून अभय?  निरुपम दिल्लीत राहुल गांधींची घेणार भेट 

कुणाल जाधव: सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 10 एप्रिल 2017

पराभावानंतरही हायकमांडची "मर्जी' राखण्यात निरुपम यांना यश आल्याने निदान वर्षभर तरी त्यांना कोणताही "धोका' नसल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर मुंबई कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांना प्रदेशाध्यक्षपदाची खुर्ची सोडावी लागणार अशी शक्‍यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात मात्र, पराभावानंतरही हायकमांडची "मर्जी' राखण्यात निरुपम यांना यश आल्याने निदान वर्षभर तरी त्यांना कोणताही "धोका' नसल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. याविषयी चर्चा करण्यासाठी निरुपम दिल्लीला रवाना झाले असून उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भेटणार आहेत. 

नुकत्याच पार पडलेल्या मुंबई पालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला केवळ 31 जागांवर विजय मिळविणे शक्‍य झाले होते. मुंबई प्रदेशाध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळेच हा पराभव झाल्याचा थेट आरोप माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत, माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी केला होता. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही या पराभवासाठी निरुपम यांना जबाबदार धरले होते. पक्षातील अनेक दिग्गजांनी याविषयीची नाराजी हायकमांडकडे बोलूनही दाखविली होती. या साऱ्या प्रकारनंतर प्रदेशाध्यक्षपदावरुन निरुपम यांना हटविले जाण्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती.

नारायण राणे, भाई जगताप आणि इतर नेत्यांची या पदावर वर्णी लागणार असल्याची कुजबुजही सुरु झाली. मात्र, तरिही अद्याप निरुपम यांनी आपले पद टिकवून ठेवले आहे. निदान वर्षभर तरी मुंबई प्रदेशाध्यक्ष बदलणार नसल्याचे संकेत देत हायकमांडने निरुपम यांना "ग्रीन सिग्नल' दिला आहे. यामुळे निर्धास्त झालेले निरुपम उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. या भेटीत मुंबईतील पराभूत उमेदवारांच्या मुलाखतीचा अहवाल उपाध्यक्षांसमोर मांडला जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणुक लढविण्याच्या विचारात असलेल्या निरुपम यांच्यासाठी हे "जीवनदान' फार महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित लेख