Nirmala Gavit Cried in her office After Hearing Plight of a women | Sarkarnama

निराधार महिलेची व्यथा ऐकून आमदार निर्मला गावीत कार्यालयातच रडल्या

संपत देवगिरे 
गुरुवार, 10 जानेवारी 2019

इगतपुरी तालुक्यातील विधवा, निराधार महिला आज तहसीलदार कार्यालयात शासनाकडून मिळणारे अर्थसहाय्य घेण्यासाठी आल्या होत्या. यावेळी आमदार गावीत देखील तेथेच होत्या. या महिलांची माहिती मिळाल्यावर त्या स्वतःहून त्यांना भेटल्या.  यावेळी तारांगण पाड्याच्या तोलाताई ठाकरे या विधवेच्या वाट्याला आलेली हेळसांड, सासरच्या मंडळींकडून जमीन हडपण्यासाठीचा दबाव, उपासमार आणि या सगळ्या अडचणीतून मुलांना शिकवण्यासाठी पोटाला चिमटा घेऊन जगण्याची व्यथा या महिलेने त्यांना सांगितली. 

नाशिक : अवेळी वैधव्य आलेल्या आदिवासी महिलेला सासरच्या लोकांकडून झालेली हेळसांड, रोज रोज होणारी अपमानास्पद वागणुक अशा स्थितीत पोटाला चिमटा घेऊन मुलाचे संगोपन केलेल्या एका महिलेची व्यथा ऐकून आमदार निर्मलाताई गावीत तहसीलदार कार्यालयातच रडल्या. त्या विधवेला मिठी मारत मी तुझी मोठी बहिण, अडचण असेल तेव्हा हक्काने फोन कर, असा धीर दिला. 

इगतपुरी तालुक्यातील विधवा, निराधार महिला आज तहसीलदार कार्यालयात शासनाकडून मिळणारे अर्थसहाय्य घेण्यासाठी आल्या होत्या. यावेळी आमदार गावीत देखील तेथेच होत्या. या महिलांची माहिती मिळाल्यावर त्या स्वतःहून त्यांना भेटल्या.  यावेळी तारांगण पाड्याच्या तोलाताई ठाकरे या विधवेच्या वाट्याला आलेली हेळसांड, सासरच्या मंडळींकडून जमीन हडपण्यासाठीचा दबाव, उपासमार आणि या सगळ्या अडचणीतून मुलांना शिकवण्यासाठी पोटाला चिमटा घेऊन जगण्याची व्यथा या महिलेने त्यांना सांगितली. 

ती ह्रदयद्रावक माहिती ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. आमदार निर्मलाताई गावीत याही भावनीक होऊन रडू लागल्या. या सगळ्याच महिलांनी त्यांना गराडा घातला. आमदार गावीत यांनी त्यांना आपला भ्रमणध्वनी क्रमांक दिला. मी तुमची हक्काची मोठी बहिण. अडचण असेल तेव्हा अर्ध्या रात्री देखील फोन करा. मी आहे पाठीशी, या शब्दात त्यांना धीर दिला.  
 
संबंधित लेख