Nirmala Gavit Against giving water of Igatpuri to Mumbai and Marathwada | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

इगतपुरीच्या पाण्यासाठी काँग्रेस आमदार निर्मला गावीत सरकारविरोधात कडाडल्या 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

नाशिक जिल्ह्यात पाण्यावरुन राजकीय वाद- विवाद थांबण्याची चिन्हे नाहीत. यासंदर्भात त्यांनी राज्य शासनाला पत्र लिहिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे. प्रथम इगतपुरी तालुक्‍यातील जनतेला पिण्याचे पाणी द्या, नंतरच शहापूरसाठी पाणी आरक्षित करा. असा इशारा यासंदर्भात झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

नाशिक : महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ख्याती असलेल्या इगतपुरीच्या धरणातील पाणी मुंबई, मराठवाड्यापाठोपाठ शहापूरच्या बहात्तर तालुक्‍यांनाही दिले जाणार आहे. मात्र यंदा या चेरापुंजीच्या घशाला कोरड पडली आहे. त्यांना तहानलेले ठेऊन इतरांना पाणी देणे योग्य आहे काय?, असा प्रश्न उपस्थित करीत 'असे झाल्यास रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करु' असा इशारा काँग्रेसच्या आमदार निर्मला गावीत यांनी दिला आहे. 

नाशिक जिल्ह्यात पाण्यावरुन राजकीय वाद- विवाद थांबण्याची चिन्हे नाहीत. यासंदर्भात त्यांनी राज्य शासनाला पत्र लिहिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे. प्रथम इगतपुरी तालुक्‍यातील जनतेला पिण्याचे पाणी द्या, नंतरच शहापूरसाठी पाणी आरक्षित करा. असा इशारा यासंदर्भात झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

शासनाच्या निर्णयाविरोधात आमदार निर्मला गावितांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय जनआंदोलनाचा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान भावली धरणातून शहापूरला पाणी आरक्षित करण्याचा प्रश्न अधिक पेटणार असल्याची चिन्ह आहेत. तालुक्‍यातील शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, माकप, रिपाइं आदी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सामुहिक लढ्याचे नियोजन केले आहे. शासनाने तात्काळ शहापुरला पाणी आरक्षित करण्याचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करावा, इगतपुरी तालुक्‍यातील जनतेसाठी पिण्याचे पाणी, सिंचनासाठी कायम आरक्षित करावे; अन्यथा न्याय मिळेपर्यंत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या आमदार निर्मला गावित यांनी दिला आहे. 

संबंधित लेख