Niphad NCP Set to Challenge Shivsena | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

बारामती, इंदापूर नंतर 'निफाड'ची निवडणुक तयारीत बाजी 

संपत देवगिरे
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

निफाडमध्ये दोन हजार तीनशे कार्यकर्ते बुथ स्तरावर काम करीत आहेत. बारामती व इंदापूर मतदारसंघ भक्कम करण्यासाठी त्यांनी दुप्पट यंत्रणा उभारली आहे. स्वतः अजित पवार यांनी त्यात लक्ष घातले आहे. गावपातळीवरच्या कार्यकर्त्यांच्याही ते संपर्कात आहेत. तशी यंत्रणा उभारण्याचा माजी आमदार दिलीप बनकर यांचाही मानस आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी शिवसेनेला आव्हान देण्यास सज्ज आहे. 

नाशिक, ता. 26 ः राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र, बहुतांश पदाधिकारी या संदर्भात गोंधळलेले आहेत. त्यामुळे 'ग्राऊंड'वरच्या तयारीत बारामती, इंदापूर मतदारसंघानंतर नाशिकच्या निफाड मतदारसंघाने यात आघाडी घेतली आहे. या मतदारसंघात बुथनिहाय यंत्रणा व त्याची चाचणी यशस्वी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते शिवसेनेला आव्हान देण्याच्या मनःस्थितीत आहेत. 

निफाड विधानसभा मतदारसंघ गेली दोन टर्म शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी आपल्याकडे राखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षातील स्थानिक सोय-गैरसोयीचे राजकारण यासह विविध कारणे त्यांना अनुकुल ठरली. मात्र काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ जिंकण्यासाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यादृष्टीने 'ग्राऊंड लेव्हल'वर पक्षबांधणीवर सर्वाधिक भर दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'आयटी' सेलची बैठक नुकतीच झाली. त्यात शंभर टक्के बुथयंत्रणा असलेल्या मतदारसंघात बारामती, इंदापुर नंतर निफाड हा एकमेव मतदारसंघ ठरला.

निफाडमध्ये दोन हजार तीनशे कार्यकर्ते बुथ स्तरावर काम करीत आहेत. बारामती व इंदापूर मतदारसंघ भक्कम करण्यासाठी त्यांनी दुप्पट यंत्रणा उभारली आहे. स्वतः अजित पवार यांनी त्यात लक्ष घातले आहे. गावपातळीवरच्या कार्यकर्त्यांच्याही ते संपर्कात आहेत. तशी यंत्रणा उभारण्याचा माजी आमदार दिलीप बनकर यांचाही मानस आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी शिवसेनेला आव्हान देण्यास सज्ज आहे. 

निफाड मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या दहा सदस्यांमध्ये अमृता पवार, मंदाकिनी बनकर, सिध्दार्थ वनारसे, सुरेश कमानकर हे चार तर पंचायत समितीत वीस पैकी सात सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. त्यात अमृता पवार यांना सर्वाधिक दहा हजाराहून अधिक मते मिळालेली आहेत. विविध विविध कार्यकारी सहकारी संस्था, ग्रामपंचायत, मोठ्या गावांत पक्षाची सत्ता आहे. माजी दिलीप बनकर, जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार हे प्रमुख इच्छुक उमेदवार आहेत. 

संबंधित लेख