Ninty Seven Percent complaints sovled Clamis Tukaram Mundhe | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

नागरिकांच्या 97 टक्के तक्रारींचे निराकरण केल्याचा तुकाराम मुंढेंचा दावा 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

महानगरपालिकेच्या वतीने 'वॉक विथ कमिशनर' उपक्रमातंर्गत महापालिका आयुक्त मुंढे यांनी आज सकाळी आकाशवाणी टॉवर येथे नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी मांडलेल्या काही तक्रारींचे त्वरित निराकरण केले. खातेप्रमुखांना प्रश्न मार्गी लावण्याचे सुचित केले. येथे नागरिकांच्या एकोणचाळीस तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

नाशिक : "आपल्या समस्या नागरिकांनी 'एन.एम.सी. ई कनेक्‍ट' ऍप द्वारे कराव्यात. त्यासाठी प्रशासनाने संबंधीतांची जबाबदारी निश्‍चित केली आहे. त्यामुळे घरबसल्या प्रश्‍नांचे वेळेत निराकरण होईल. आतापर्यंत 97 टक्के तक्रारींचे निराकरण झाले आहे. शहरात 112 ठिकाणी ई टॉयलेट उभारण्यात येत असल्याने लवकरच शहराचे चित्र बदलेल," असे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले.

महानगरपालिकेच्या वतीने 'वॉक विथ कमिशनर' उपक्रमातंर्गत महापालिका आयुक्त मुंढे यांनी आज सकाळी आकाशवाणी टॉवर येथे नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी मांडलेल्या काही तक्रारींचे त्वरित निराकरण केले. खातेप्रमुखांना प्रश्न मार्गी लावण्याचे सुचित केले. येथे नागरिकांच्या एकोणचाळीस तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यावेळी ते म्हणाले, ''शहरात असणारी सार्वजनिक स्वच्छतागृहे ही सर्व सुविधायुक्त होणार आहेत. विविध भागांत 112 ठिकाणी नव्याने ई टॉयलेट होणार आहेत. 2022 पर्यंत भुयारी गटार योजना पूर्ण होणार आहे. येत्या वर्षभरात शहरातील पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जाणार आहेत. शहरात नवीन उद्याने, नवीन क्रीडांगण होणार आहेत. विरंगुळा केंद्राची जबाबदारी ज्येष्ठ नागरिक संघाकडे देण्यात येईल." जलद कार्यवाहीसाठी नागरिकांनी आपल्या समस्या एन.एम.सी. ई कनेक्‍ट अॅपवर टाकाव्यात असे आवाहन त्यांनी केले. 

संबंधित लेख