..तर प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रात राहता येणार नाही : निलेश राणे

भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात मराठा आरक्षणावरून वाद सुरू झाला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने या आरक्षणाचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केल्याने त्यास निलेश राणे यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे.
..तर प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रात राहता येणार नाही : निलेश राणे

पुणे : भारिपचे बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊ शकत नसतील, तर त्यांनी या विषयावर बोलू नये. आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी नाक खुपसण्याची गरज नाही. मराठा समाजाचा तो हक्क आहे, तो त्यांना मिळाला पाहिजे. आरक्षणासाठी आम्ही भीक मागत नाही. महाराष्ट्रात राहायचे असेल, तर मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यावाच लागेल, असा इशारा माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान संघटनेचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी सोमवारी पुण्यात दिला. 

कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाली असून, पिडित मुलीला न्याय मिळावा आणि मराठा आरक्षणासाठी सरकारने पावले उचलावीत, याबाबत राणे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. कोपर्डी घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी, अशी मागणी करीत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषयही उचलून धरला.

राणे म्हणाले, "" मध्यंतरी "राणे समितीचा बट्टयाबोळ' या शीर्षकाखाली प्रकाश आंबेडकर यांनी एका वर्तमानपत्रात मराठी आरक्षणाविषयी भूमिका मांडली होती. त्यांना या विषयावर बोलण्याची काहीही गरज नाही. तो सरकारचा आणि आयोगाचा विषय आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये आणि त्याला उशीर व्हावा, यासाठी आंबेडकर अधूनमधून परिपत्रक काढतात. त्यामुळे मराठा समाजाचे नुकसान होत आहे. राणे समितीच्या अहवालाबाबत ते चुकीचे बोलत आहेत. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काहीही करण्यास तयार आहोत.'' 

खासदार राजू शेट्टी यांच्या शेतकरी आंदोलनाबद्दल राणे म्हणाले,"" शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार स्तरावर योग्य चर्चा व्हावी. त्यांच्या मागण्या योग्य असतील, तर आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत. खासदार शेट्टी यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केली आहेत. शेट्टी यांच्या आंदोलनाने प्रश्न सुटणार असेल, तर आम्ही 100 टक्के त्यांच्याही पाठीशी आहोत.'' 

कोपर्डी घटनेतील आरोपींवर हल्ला करणाऱ्या शिवबा संघटनेतील चार जणांना नुकताच जामीन मिळाला असून, त्यांना आपण पाठिंबा देणार आहोत. कोपर्डीतील प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे. त्यावर मी काही बोलणार नाही, असेही त्यांनी सांगितले. कोपर्डी घटनेतील आरोपींवर हल्ला करणारे अमोल खुने, बाबू वाळेकर, गणेश खुने आणि राजू जऱ्हाड परिषदेला उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com