Nilesh Lanke posing Challenge to MLA Vijay Auti | Sarkarnama

निलेश लंके यांच्या धसक्याने आमदार विजय आैटी यांची पळता भुई थोडी

मार्तंडराव बुचुडे
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

औटी यांच्या पासून दुरावलेल्या लंके सुरूवातीला आपण निवडणूक लढविणार नाही, असे म्हणत अाता आगामी विधानसभेसाठी आपणच कसे दावेदार आहोत, हे सांगत आता रात्रंदिवस पायाला भिंगरी लावल्यासारखे मतदारसंघात फिरत आहेत. शिवसेनेतून बाहेर पडताच चिन्ह नंतर ठरवू अशी घोषणा करत स्वत:च्या वाढदिवसापासून ते थेट कार्यकर्त्यांचे वाढदिवस व छोटे मोठे कार्यक्रम करत संपुर्ण मतदार संघात संपर्क अभियान सुरू केले आहे.

पारनेर : विधानसभेसाठी अजून अवधी असला, तरी पारनेरचे राजकारणी मात्र खडबडून जागे झाले आहेत. शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख निलेश लंके यांनी मतदारसंघात सुरू केलेला वाढता संपर्क व विविध कार्यक्रमांसाठी मतदारांशी सुरू केलला संपर्क दौरा, या मुळे चौकार मारण्याच्या तयारीत असलेले व पारनेर मतदार संघातील छोटे मोठे कार्यक्रम टाळणारे आमदार विजय औटी आता मात्र कार्यकर्त्यांच्या वाढदिवसापासून आगदी छोट्या कार्यक्रमांसाठीही उपस्थिती लावत आहेत. तसेच त्यांनी दररोज विविध विकास कामांच्या उदघाटनांचाही सपाटा लावला आहे. 

तालुक्यात आमदार औटी यांची प्रतिमा कामाचा माणुस अशी तयार झाली आहे, मात्र तोंडाने फटकळ हीच तक्रार त्यांच्या बाबत अनेकजण त्यांच्या अपरोक्ष करतात. मात्र, यात अडचण फक्त कार्यकर्त्यांची होते. सामान्यांना त्याचे फरसे काही वाटत नाही, कारण सामान्य जनतेला फारसे वैयक्तीक आमदार औटी यांचेकडे काम पडत नसते. त्यामुळे सामान्य मतदार त्यांच्याकडे जातही नाहीत. औटी हे  तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे करतात ना मग आपल्याला काय घेणे देणे. असा विचार तालुक्यातील जनता करत आहे.     

त्याचा परिणाम आजही तालुक्यात दुसरा प्रबळ विरोधक किंवा दावेदार तयार झाला नाही. मात्र आपल्याच पक्षातील लंके विरोधात गेल्याने व त्यांनी मोठ्या प्रमाणात तालुक्यात व मतदार संघातही  संपर्क अभियान सुरू केल्याने  औटी यांची झोप उडाली आहे. आता औटी यांनीही गेली काही महिन्यांसापासून उदघाटनांचा सपाटा लावला  आहे. तसेच कधीही वाढदिवसाला न जाणारे औटी आता कार्यकर्त्यांचे  वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरे करू लागले आहेत. 

औटी यांच्या पासून दुरावलेल्या लंके सुरूवातीला आपण निवडणूक लढविणार नाही, असे म्हणत अाता आगामी विधानसभेसाठी आपणच कसे दावेदार आहोत, हे सांगत आता रात्रंदिवस पायाला भिंगरी लावल्यासारखे मतदारसंघात फिरत आहेत. शिवसेनेतून बाहेर पडताच चिन्ह नंतर ठरवू अशी घोषणा करत स्वत:च्या वाढदिवसापासून ते थेट कार्यकर्त्यांचे वाढदिवस व छोटे मोठे कार्यक्रम करत संपुर्ण मतदार संघात संपर्क अभियान सुरू केले आहे. त्यांनी निलेश लंके नांवाने प्रतिष्ठान स्थापन करून त्या प्रतिष्ठानच्या नावाने अनेक गावात शाखा काढण्याचा सपाटा लावला आहे. 

मात्र त्यांनी अध्यापही कोणत्या पक्षात जाणार किंवा काय याची जाहीर चर्चा केली नाही. निवडणूक लढविणार हे निश्चित झाले आहे. मात्र, पक्ष व चिन्ह नंतर ठरवू असे ते सध्या सांगत आहेत. गावोगाव तरूण कार्यकर्त्यांचा संच तयार करत आहेत. सतत जनतेच्या संपर्कात रहाण्यासाठी लंके सतत्याने काही तरी विविध कार्यक्रमांचे नियोजन करत आहेत. मग तालुक्यातील महिला किंवा तरूणांसाठीचे देवदर्शन असो की, एखादा सामाजिक उपक्रम असो.  त्याचाच एक भाग म्हणून अता त्यांनी शेतक-यांसाठी नोव्हेंबर महिण्यात पारनेर येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरविण्याचे ही नियोजन केले आहे. 

त्यांना किती कार्यकर्ते व नेते मंडळी जोडली जातात, त्यांना कोणत्या  पक्षाची उमद्वारी मिळते,  की आयत्यावेळी निवडणूक न लढविता  थांबतात, हे मात्र काळच ठरविणार आहे. सध्या मात्र त्यांनी औटी व इतर प्रमुख पक्षांच्या नेत्यांसमोर एक तगडे आव्हान उभे केले आहे.    

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख