निलेश लंकेंनी हातावर `घड्याळ` बांधलं...जयंत पाटलांनी स्वागत केलं...

निलेश लंकेंनी हातावर `घड्याळ` बांधलं...जयंत पाटलांनी स्वागत केलं...

नगर : मागील अनेक दिवसांपासून पारनेर तालुक्यात जोराजोराने घोंगावत असलेलं निलेश लंके नावाचं वादळ आज अखेर राष्ट्रवादीच्या घड्याळावर स्थिरावलं. राष्ट्रवादी काॅग्रेसच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत लंके यांनी मनोगत व्यक्त करून आपण राष्ट्रवादीचे नेतृत्त्व स्वीकारत असल्याचं आज जाहीर केले. ३१ जानेवारी रोजी पारनेरमध्ये होणाऱ्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आपण सुमारे ५० हजार कार्यकर्त्यांसह ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

शिवसेनेचे आमदार विजय आैटी यांच्याशी बिनसल्यानंतर लंके यांना शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदावरून दूर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघात जोरदार जनसंपर्क वाढवित आपण विधानसभा लढविणार असल्याचे वारंवार जाहीर केले. ते कोणत्या पक्षात जाणार, याबाबत अनेकदा वावड्या उठत होत्या. राष्ट्रवादीशी जवळीक वाढत असल्याने ते राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार, याबाबत चिन्हे दिसून येत होती. मात्र, समाजवादी पक्षाच्या नेत्यांनीही ते आपल्या संपर्कात असल्याचे सांगितले होते. त्यामुळे संदिग्धता होती. मात्र त्याला आज पूर्णविराम मिळाला.

राष्ट्रवादीच्या कार्यालयात लंके यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसह येवून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे घोषित केले. पाटील यांनीही लंके यांचा प्रवेश ३१ तारखेला होणाऱ्या मेळाव्यात करून घेणार असल्याचे सांगितले.

एकनिष्ठ राहूनही शिवसेनेने केली हकालपट्टी

शिवसेनेला एकनिष्ठ राहूनही त्यांनी माझी हकालपट्टी केली. त्यानंतर माझा राष्ट्रवादीशी संपर्क आला. मी शिवसेनेचा होतो, तरीही शरद पवार यांचे आदर्श घेत होतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा मी निर्णय घेतला आहे. येत्या ३१ तारखेला सुमारे ५० ते ६० हजार लोकांच्या उपस्थितीत आपण प्रवेश करणार असल्याचे निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com