nikhil ghaytadak elected as jamkhed council president | Sarkarnama

जामखेडच्या नगराध्यक्षपदी निखिल घायतडक 

वसंत सानप 
शनिवार, 28 जुलै 2018

जामखेड : पालकमंत्री राम शिंदे यांच्या ताब्यात असलेल्या जामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध करण्यात पालकमंत्री शिंदे यशस्वी झाले. नगराध्यक्षपदासाठी नगरसेवक निखिल घायतडक यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले. 

जामखेड : पालकमंत्री राम शिंदे यांच्या ताब्यात असलेल्या जामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध करण्यात पालकमंत्री शिंदे यशस्वी झाले. नगराध्यक्षपदासाठी नगरसेवक निखिल घायतडक यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले. 

जामखेड नगरपालिकेच्या स्थापनेला अडीच वर्षे पूर्ण झाले. पहिल्यांदा नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले होते. याकाळात माजी मंत्री सुरेश धस समर्थक विकास राळेभात यांच्या पत्नी प्रिती राळेभात या नगरसेवक झाल्या. पुढे राजकीय डावपेच झाले आणि पालिकेत सत्तांतर झाले पालकमंत्री शिंदे यांचे समर्थक भाजपचे शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात यांच्या पत्नी अर्चना राळेभात यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. 

दुसऱ्या अडीच वर्षासाठी नगराध्यक्षपद अनुसुचित जातीच्या प्रवर्गातील व्यक्ती करिता आरक्षित झाले. या प्रवर्गातून निखिल घायतडक व विद्या वाव्हळ हे दोन नगरसेवक निवडून आलेले आहेत. अपसुकच त्या दोघांनीही या पदासाठी प्रबळ दावा केला होता. मात्र पालकमंत्री राम शिंदे यांचा आदेश अंतिम मानण्याची तयारी ठेवली. पालकमंत्री प्रा.शिंदेंनीही दोघांनाही समान संधी दिली जाईल,असे सांगून निवडीच्या निमित्ताने निर्माण होणार्या राजकारणातील हवाच काढून घेतली. 

शुक्रवार (ता.27) निवड प्रक्रीयेसाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस, निखिल घायतडक व विद्या वाव्हळ या दोघांचेही उमेदवारी अर्ज तयार करून ठेवले होते.दोघे ऐकमेकाला सूचक होते. पालकमंत्री िंशदे यांचा निरोपाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिंदे यांनी निखिल यांचा अर्ज दाखल करण्याचे सांगितले आणि शिगेला पोहचलेली उत्कंठता ओसरली. 

संबंधित लेख