newase-gadakh-ghule-murkute | Sarkarnama

नेवासे मतदारसंघात गडाख-घुले-मुरकुटे समर्थकांमध्ये संघर्ष 

सुनील गर्जे
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे थकीत पेमेंट द्या, अन्यथा आंदोलन असा माजी आमदार शंकरराव गडाख यांनी दिलेला इशारा, त्यावर ज्ञानेश्वर व्यवस्थापनाने जाहीर केलेला पेमेंटचा फरक, श्री ज्ञानेश्वर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची उपस्थिती या पार्श्वभूमीवर नेवासे तालुक्यात सोशलमिडियावर गडाख-घुले-मुरकुटे समर्थकांचा चांगलाच राजकीय संघर्ष पेटला आहे. 

नेवासे (जि. नगर)  : ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे थकीत पेमेंट द्या, अन्यथा आंदोलन असा माजी आमदार शंकरराव गडाख यांनी दिलेला इशारा, त्यावर ज्ञानेश्वर व्यवस्थापनाने जाहीर केलेला पेमेंटचा फरक, श्री ज्ञानेश्वर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची उपस्थिती या पार्श्वभूमीवर नेवासे तालुक्यात सोशलमिडियावर गडाख-घुले-मुरकुटे समर्थकांचा चांगलाच राजकीय संघर्ष पेटला आहे. 

नेत्यांच्या समर्थनार्थ व आरोप-प्रत्यारोपाच्या अनेक व्हॉटसअप ग्रुपवर समर्थकांच्या दिवस-रात्र पोस्ट धडकत आहेत. विशेष म्हणजे गडाख, घुले, मुरकुटे, अभंग, लंघे हे नेते अनेक ग्रुपवर आहेत.

गडाख-मुरकुटे समर्थकांचा सोशल मिडियावर राजकीय संघर्ष पेटण्याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे 'ज्ञानेश्वर'ला देण्यात आलेल्या २०१७-१८ या वर्षीच्या ऊसाचे थकीत पेमेंट शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी माजी आमदार शंकारराव गडाख यांनी दिलेले निवेदन, त्यावर लगेचच घुले-अभंग यांनी जाहीर केलेला फरक. त्यावर कडी करत गडाखांनी हा फरक देण्याची तारीख जाहीर करा आणि गेल्या दहा वर्षाच्या फरकाचे काय, असा सवाल, आमदार बाळासाहेब मुरकुटेंची ज्ञानेश्वरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहून 'ज्ञानेश्वर' कारभाराची केलेली स्तुती, फरक जाहीर केल्याने मुरकुटेंची उडालेली झोप व घुलेबंधुचा आत्तापर्येंत मिळालेल्या 'आधारा'ची जाहीर वाच्चता आणि घुले बंधूंसह माजी आमदार पांडुरंग अभंग, विठ्ठल लंघे यांचे मौन तर या नेत्यांच्या समर्थक कार्येकर्त्यांच्या नेत्यांच्या व स्वत:च्या पानउतारा करणाऱ्या व्होट्सअप ग्रुप, फेसबुकवर धडकणाऱ्या 'पोस्ट'. 

या संघर्षात गडाख समर्थकांकडून घुलेंवर मुरकुटे-घुलेंच्या छुप्या युतीबरोबरच त्यांनी ज्ञानेश्वरच्या माध्यमातून 75 कोटीचे खाल्ले लोणी, ज्ञानेश्वरचा कारभार, त्यांची जाहीर केलेला व तालुक्यात ठिकठिकाणी घुलेबंधूंच्या छबी असलेले लावण्यात आलेले 'फ्लेक्स', गडाखांमुळे केलेला फरक जाहीर, तसेच विधानसभा निवडणुकीत गडाखांच्या पाठीत खुपसला खंजीर तर मुरकुटेंवर तालुक्यातील कृषी घोटाळा, रस्ते, समाज मंदिर कामांत गैरव्यवहार, ज्ञानेश्वरच्या कारभारा विषयी चुप्पी, तालुक्यातील शेतकर्यांपेक्षा घुलेंची काळजी, पाहुण्यांना ‘लक्ष्मी दर्शन’, वाळू तस्करांना आश्रय, तहसिलदार पाटील यांची बदली, कोट्यावधीच्या बंगल्याचे बांधकाम, गंगापूर जमीन खरेदी, नातेवाईकान मार्फत ठेकेदारी घरात, तर घुले-मुरकुटे समर्थकांकडून गडाखांवर शनैश्वर देवस्थान, मुळा कारखाना, शैक्षणिक संस्थाचा कारभारा अशा आरोपाच्या पोस्ट गडाख-घुले-मुरकुटे समर्थकांकडून टाकण्यात येतात. 

विशेष म्हणजे समर्थक चोवीसतास ऑनलाईन'च असतात. 
दरम्यान, समर्थक एकमेकांसह नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप करतांना टाकलेल्या पोस्ट'वरून अनेक वेळा वादही झाले. मात्र सध्यातरी हा समर्थकांचा संघर्ष सोशल मिडियापूर्ताच मर्यादित असला तरी आगामी काळात हा संघर्ष तालुक्याच्या राजकारणात पहायला मिळणार हे नक्कीच. ग्रुप 

सोशल मिडीयावर सक्रीय नेते
माजी आमदार शंकरराव गडाख, नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, पांडुरंग अभंग, आमदार बाळासाहेब मुरकुटे, विठ्ठल लंघे, सुनीता गडाख, प्रशांत गडाख, सुनील गडाख, संजय सुखधान, नितीन दिनकर, दिनकर गर्जे, उदयन गडाख, उपनगरध्यक्ष, अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्यासह महसूल-पोलीस अधिकारी ग्रुपमध्ये सामावेश आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख