New Sarpanchs to get Certificate | Sarkarnama

ग्रामपंचायत सदस्य, सरपंचांना प्रमाणपत्र मिळणार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. गावगाड्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या निवडणूक नियमांतील सुधारणांमुळे विजयी उमेदवारांना पहिल्यांदाच शासनाकडून प्रमाणपत्र दिले जाईल. निकालानंतर निवडणूक निर्णय अधिकारी निर्वाचित सरपंच, सदस्यांना संगणकीकृत प्रमाणपत्र देतील.

नाशिक : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. गावगाड्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या निवडणूक नियमांतील सुधारणांमुळे विजयी उमेदवारांना पहिल्यांदाच शासनाकडून प्रमाणपत्र दिले जाईल. निकालानंतर निवडणूक निर्णय अधिकारी निर्वाचित सरपंच, सदस्यांना संगणकीकृत प्रमाणपत्र देतील.

ग्रामपंचायत निवडणुक रणधुमाळीमुळे प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्य निवडणूक आयोगाने खर्च मर्यादेत वाढ केली आहे. सरपंच पदासाठी उमेदवारी करणा-यास ही मर्यादा ग्रामपंचायत सदस्य संख्येच्या प्रमाणात निश्‍चित केली आहे. खर्च मर्यादेच्या वाढीमुळे ग्रामपंचायतच्या निवडणूक लढविणासाठी इच्छुकांत समाधानाचे वातावरण आहे.

या आधी ग्रामपंचायतींमध्ये किमान तीन व कमाल सहा प्रभाग होते. ग्रामपंचायत लढविणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींच्या उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा सरसकट 25 हजार होती. त्यामुळे चहा, नाश्‍ता इतर वाढलेल्या खाद्यपदार्थाच्या दरामुळे तसेच इतर वस्तूच्या महागाईमुळे या मर्यादेच्या आत राहून खर्च करणे एक प्रकारे उमेदवारांसाठी एक आव्हान होते. याशिवाय निवडणुकीसाठी वाटावी लागणारी पत्रके, बॅनर, स्टीकर व इतर प्रचार साहित्य यांचेही दर वाढले आहे. त्यामुळे या खर्चात वाढ होणे ग्रामपंचायतीच्या उमेदवारांसाठी गरजेचे होते.

अशातच 19 जुलै 2017 च्या अध्यादेशानुसार ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करून सरपंचपदासाठी जनतेतून निवडणूक घेण्याची तरतूद करण्यात आली त्यामुळे सरपंच पद हे सर्व प्रभागाकरिता समाईक असून, प्रत्येक प्रभागातून एकाच वेळी मतदान होणार आहे. हे लक्षात घेऊन सरपंच पदाच्या उमेदवारास ग्रामपंचायतीच्या सर्व प्रभागात प्रवासकरीता सर्व संपर्क साधने आवश्यक आहेत. त्यामुळे प्रभाग संख्येच्या प्रमाणात सरपंच पदाच्या उमेदवारांसाठी निवडणूक खर्च मर्यादा वाढली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत हा खर्च समाविष्ट केला जाणार आहे. खर्चाचा तपशील निकालानंतर एक महिन्यात सादर करावा लागेल.

उमेदवारांची खर्च मर्यादा
सदस्य, सरपंच पदासाठी ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येच्या प्रमाणात निवडणूक आयोगाने निश्‍चित केलेली नवीन निवडणूक खर्च मर्यादा
7 ते 9 सदस्य ( 25 हजार), 11 ते 13 सदस्य (35 हजार), 15 ते 17 सदस्य ( 50 हजार ),

* सरपंच पदासाठी 7 ते 9 सदस्य (50 हजार), 11 ते 13 सदस्य (1 लाख), 15 ते 17 सदस्य (1 लाख 75 हजार )

संबंधित लेख