new police commissioner warns criminals | Sarkarnama

गुन्हेगारांना नवे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांचा इशारा

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पुणे : "पुणे पोलिसांनी अनेक चांगल्या योजना राबविल्या. त्यापैकी एक असलेली "बडीकॉप'सारखी योजना आम्ही नागपूरमध्ये प्रत्यक्षात उतरविली. त्यामुळे या योजना भविष्यातही सुरूच राहतील.'' असे मत नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ .के. व्यंकटेश यांनी शुक्रवारी व्यक्त केले. तर "गुन्हेगारांनो गुन्हेगारी सोडा' असा इशाराही डॉ.व्यंकटेशम यांनी दिला आहे. 

पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी डॉ.के.व्यंकटेशम यांच्याकडे पोलिस आयुक्त कार्यालयात सुपूर्द केले. यावेळी पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम, सुनील फुलारी, अतिरिक्त पोलिस आयुक्त साहेबराव पाटील, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे, शहर उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्‍त सुनील फुलारी उपस्थित होते. 

डॉ.व्यंकटेश म्हणाले, ""राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे, येथे पद स्वीकारणे हे अतिशय जबाबदारीचे काम आहे. पुणे पोलिसांचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. चांगल्या योजना इथे राबविल्या जातात, भविष्यातही या योजना सुरू राहतील.'' डॉ.के.व्यंकटेशम यांच्याकडून आपण यापूर्वी एकदा सूत्रे घेतली होती, आता मी त्यांना पोलिस आयुक्त पदाची सूत्रे देत असल्याचे शुक्ला यांनी सांगितले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख