मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या 'गळती'ने काढली पुण्याच्या कारभाऱ्यांची लाज

आपल्याच पक्षाचे वरिष्ट नेते पाहुणे म्हणून येणार असल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जोरदार तयारी केली. पण, उदघाटनाच्या मुहुर्तावर म्हणजे साडेतीन वाजता पावसाला सुरवात झाली. त्यामुळे पाहुणे मंडळीही नियोजित वेळेपेक्षा अर्धातास उशिराने आली. तोपर्यंत पावसाचा जोरही वाढला. पाहुण्यांची भाषणे सुरू होताच, नव्या सभागृहात गळती सुरू झाली.
 मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या 'गळती'ने काढली पुण्याच्या कारभाऱ्यांची लाज

पुणे : महापालिकेच्या नव्या इमारतीचे उदघाटन सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने मोठ्या थाटात केले खरे मात्र; उदघाटनाच्या कार्यक्रमात सभागृहात पावसामुळे गळती झाल्याने बाहेर धो-धो पाऊस असतानाही वातानुकूलित सभागृहात भाजप पदाधिकारी मात्र, घामाघूम झाले. उदघाटनाच्या घाईत मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यादेखतच आपल्या कारभाराचे पितळ उघडे पडल्याने पदाधिकाऱ्यांवर नामुष्की ओढवली तर, विरोधकांचे हाती नवे कोलित मिळाले. परिणामी, या कार्यक्रमाच्या कौतुकापेक्षा नव्या इमारतीतील गळतीची चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत.
 
विस्तारीत इमारतीकरिता तब्बल 50 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. संसदेच्या धर्तीवर अद्ययावत सभागृहासह पदाधिकाऱ्यांसाठी सुसज्ज दालने उभारण्यात आली आहेत. गेल्या तीन वर्षांपासून या इमारतीचे काम सुरू असून, ते आजतागयत सुरूच आहे. या आधी उदघाटनाचे तीन मुहूर्त हुकल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला गुरुवारचा मुहर्तू सापडला. हा मुहूर्त जवळ आल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून रात्रंदिवस इमारतीचे काम आटोपण्यात येत होते. तरीही, काही कामे राहिल्याची तक्रार होती. 

मात्र, त्याकडे काणाडोळा करीत सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी उदघाटनांची जय्यत तयारी केली. आपल्याच पक्षाचे वरिष्ट नेते पाहुणे म्हणून येणार असल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जोरदार तयारी केली. पण, उदघाटनाच्या मुहुर्तावर म्हणजे साडेतीन वाजता पावसाला सुरवात झाली. त्यामुळे पाहुणे मंडळीही नियोजित वेळेपेक्षा अर्धातास उशिराने आली. तोपर्यंत पावसाचा जोरही वाढला. पाहुण्यांची भाषणे सुरू होताच, नव्या सभागृहात गळती सुरू झाली. मोजक्‍याच ठिकाणी गळती होऊ लागल्याने अधिकाऱ्यांनी थोडेसे दुर्लक्ष केले. पण, घुमटातून गळणाऱ्या पाण्याचा आवाज होऊ लागले उपस्थितांमध्ये गळतीची चर्चा सुरू झाली. त्यामुळे पदाधिकारी-अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. 

सभागृहातील नगरसेवकांच्या आसनावर पेपर अंथरत गळती लपविण्याचा केविलपणा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हा प्रयत्न लपून राहिला नसल्याने उदघाटनाची घाई मात्र, उघड झाली. 
काही किरकोळ कामे राहिली आहे. ती तातडीने केली जातील, असे नंतर पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com