new delhi jnu election | Sarkarnama

"जेएनयू'त डाव्यांचीच बाजी 

वृत्तसंस्था
रविवार, 10 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी युनियनच्या निवडणुकीत डाव्या आघाडीच्या पॅनलने बाजी मारली आहे. या निवडणुकीचा निकाल कालरात्री (शनिवारी) उशिरा जाहीर झाला. यामध्ये युनायटेड लेफ्टने चारही जागांवर सहजपणे विजय मिळवला असून गीता कुमारी आणि सिमोन झोया यांनी अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. 

विद्यार्थी युनियनच्या अध्यक्षपदासाठी युनायटेड लेफ्ट आणि अभाविप यांच्यात मोठी चुरस होती. युनायटेड लेफ्टने अभाविपचा पराभव केल्याचे स्पष्ट झाले. गेल्यावर्षी कन्हैया कुमारच्या नेतृत्त्वाखाली जेएनयूत झालेल्या आंदोलनानंतरही एआयएसए-एसएफआय या डाव्या आघाडीने चारही जागा जिंकल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. तीनही डाव्या संघटनांनी यावर्षी एकत्र निवडणूक लढवली होती. यावेळी दुग्गिराला श्रीकृष्ण हिची सचिवपदी आणि शुभांशु सिंग याची सहसचिव पदी निवड झाली. कॉंग्रेसच्या एनएसयूआय संघटनेला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेरच्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

उमेदवाराना मिळालेली मते 
अध्यक्ष- 
गीता कुमारी- (लेफ्ट यूनिटी)- 1506 
निधि त्रिपाठी- (एबीवीपी)- 1042 
शबाना अली- (बाप्सा)- 935 

उपाध्यक्ष- 
सिमोन ज़ोया खान (लेफ्ट यूनिटी)- 1876 
दुर्गेश कुमार (एबीवीपी)- 1028 
सुबोध कुमार (बाप्सा)- 910 

सचिव- 
डुग्गीराला श्रीकृष्णा- (लेफ्ट यूनिटी)- 2082 
निकुंज मकवाना- (एबीवीपी)- 975 
करम बिद्यनाथ खुमान- (बाप्सा)- 854 

सहसचिव- 
शुभांशु सिंह- (लेप्ट यूनिटी)- 1755 
पंकज केशरी- (एबीवीपी)- 920 
विनोद कुमार- (बाप्सा)- 862 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख