NEW CAR FOR PCMC MAYOR | Sarkarnama

पिंपरी महापौरांच्या मोटारीला  आता जीएसटीचा स्पीड ब्रेकर 

उत्तम कुटे
बुधवार, 28 जून 2017

पिंपरी : देशात येत्या एक जुलैपापासून देशभर जीएसटी तथा वस्तू व सेवा कर लागू होणार आहे. मात्र हाच कर पिंपरी-चिंचवडच्या महापौरांच्या नव्या गाडीसाठी अडथळा ठरेल, असे महापौर निकीन काळजे यांना स्वप्नातही वाटले नसते. मात्र त्यांना नव्या गाडीसाठी नव्या कर प्रणालीची वाट पाहण्याचा निर्णय प्रशासनाने घेता आहे. 

त्यांची दीड लाख किलोमीटर लावलेली व वारंवार बंद पडत होती. खुद्द महापौरांनाच गाडीला दे धक्का करावे लागले होते. त्यामुळे तो शहरात चर्चेचा विषय ठरला. जीएसटीमुळे महापौरांना या महिन्यात नवी मोटार मिळणार नाही, हे नक्की झाले आहे. परिणामी त्यांचा आपल्या वैयक्तिक खासगी मोटारीतून सुरु असलेला प्रवास पुढे काही दिवस सुरुच राहणार आहे. जीएसटीच्या गोंधळामुळे मोटार कंपन्यांनी महापौरांच्या मोटारीसाठी कोटेशनच दिले नसल्याने नवी मोटार प्रक्रिया खरेदी अडली असल्याचे प्रशासनाच्या वतीने बुधवारी (ता. 28) स्पष्ट करण्यात आले. 

महापौरांनी नव्या पालिका मोटारीची आशा तूर्त सोडून दिली असून आपल्या वैयक्तिक मालकीच्या मोटारीवर यांनी महापौर अशी पाटी लावली आहे. महापालिकेतील या आधीच्या महापौर मोहिनी लांडे व शकुंतला धराडे या दोन महापौरांनी पाच वर्षे वापरलेलीच पालिकेची मोटार पालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपचे पहिले महापौर काळजे वापरत होते. 

आमदार महेश लांडगे यांच्या गटाचे असलेल्या काळजे यांची कोंडी करण्यासाठी त्यांना नवी मोटार तातडीने देण्यास प्रशासनावर पकड असलेल्या दुसरा सत्ताधारी गट उत्सुक नाही. तसेच महापौरांना 15 लाख रुपयांपर्यंतचीच मोटार खरेदी करण्याच्या नियमाचा बागुलबोवाही केला जात आहे. सध्या अल्टिस ही टोयाटो कंपनीची या मर्यादेतील मोटार महापौरांसाठी आहे. त्यामुळे तीच पुन्हा वा याच कंपनीची इनोव्हा हे दुसरे मॉडेल खरेदी केली जाऊ शकते. 
 
संबंधित लेख