new alliance in aurangabad | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

"कॉंग्रेस का हाथ, शिवसेना के साथ' 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 14 मार्च 2017

औरंगाबाद जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीची निवड प्रक्रिया सुरू झाली असून शिवसेनेने सभापती व उपसभापती पदासाठी स्वतंत्र उमेदवार उभे करत कॉंग्रेसशी युती केल्याचे स्पष्ट झाले आहे.

औरंगाबाद : मुंबई महापालिका निवडणुकीपासून शिवसेना-भाजप या दोन पक्षात आलेले वितुष्ट टोकाला गेले आहे. भाजपने जरी मुंबई महापौर निवडीच्या वेळी 82 नगरसेवकांची मते शिवसेनेला दिली असली तरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप सोबत न जाण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीची निवड प्रक्रिया सुरू झाली असून शिवसेनेने सभापती व उपसभापती पदासाठी स्वतंत्र उमेदवार उभे करत कॉंग्रेसशी युती केल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत देखील हेच चित्र पहायला मिळणार आहे. 

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी कॉंग्रेसशी हातमिळवणी करण्याच्या हालचाली बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या. शिवसेनेला कॉंग्रेसची साथ मिळाल्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद अध्यक्षपदाची समीकरणे बदलली असून भाजपचे सर्वाधिक सदस्य निवडून आलेले असताना देखील त्यांना सभापती व अध्यक्षपदावर पाणी सोडावे लागणार आहे.

मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीपासूनच शिवसेना-कॉंग्रेस यांचे गुळपीठ जमले होते. भाजपला अद्दल घडवण्यासाठी तसेच ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हातपाय पसरवण्याची सधी संधी मिळू नये यासाठी शिवसेनेने कॉंग्रेसची मदत घेतल्याचे बोलले जाते. कॉंग्रेसला देखील भाजपपेक्षा शिवसेना जवळचा पक्ष वाटू लागल्याने हे समीकरण जुळून आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 9 पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडीसाठी शिवसेना व भाजपने स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी एकमेकांच्या मदतीने भाजपला डावलून शिवसेना व कॉंग्रेसचे सभापती, उपसभापती विराजमान होणार आहेत. 

संबंधित लेख