देवेंद्र साटम यांची तंगडी मुख्यमंत्र्यांनी पकडली : बाळा नांदगावकर

काही दिवसांपूर्वी देवेंद्र साटम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याबद्दल बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी, `साटम यांची तंगडी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पकडली,' अशी खिल्ली उडवली.
देवेंद्र साटम यांची तंगडी मुख्यमंत्र्यांनी पकडली : बाळा नांदगावकर

नेरळ : काही दिवसांपूर्वी देवेंद्र साटम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याबद्दल बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी, `साटम यांची तंगडी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पकडली,' अशी खिल्ली उडवली. 

कर्जत येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित जिल्हा व तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या वेळी ते बोलत होते. या वेळी मनसे रायगड जिल्हा व विविध शाखांच्या वतीने नांदगावकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेलेले माजी आमदार देवेंद्र साटम यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, खेळाडू व कबड्डी रसिक उपस्थित होते. 

ते म्हणाले, की राजकारण हे कबड्डीच्या खेळासारखेच आहे. राजकारणात आम्हीही कबड्डीच खेळत असतो; मात्र आमचे पाय खूप वेळा खेचले जातात. या ठिकाणी मंचावर माझे जुने मित्र देवेंद्र साटम उपस्थित आहेत. त्यांनाही कबड्डी खेळाची प्रचीती आहे; कारण सध्या त्यांची तंगडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पकडली आहे. 

कबड्डीमध्ये जसे संघात डावलले गेल्यावर आपण संघ बदलतो; तसेच राजकारणात डावलल्‌ गेल्यावर पक्ष बदलला जातो. आम्हालाही शिवसेनेत डावलले गेले म्हणून साटम आणि मी पक्ष सोडला; मात्र पक्ष सोडल्यावर काही वेळेला "न घर का न घाट का' अशी गत होते, तेव्हा आहात त्या संघातच राहा, असा सल्लादेखील त्यांनी उपस्थित कबड्डी संघांना दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com