लोकांची नुसती मने ओळखू नका; जिंकायला शिका : बाळा नांदगावकर

लोकांची मने नुसती ओळखू नका; तर ती जिंकायलासुद्धा हवीत, असे प्रतिपादन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले.
लोकांची नुसती मने ओळखू नका; जिंकायला शिका : बाळा नांदगावकर

नेरळ : लोकांची मने नुसती ओळखू नका; तर ती जिंकायलासुद्धा हवीत, असे प्रतिपादन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले. 

कर्जत येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित जिल्हा व तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या वेळी ते बोलत होते. 

तरुणांमधील क्रीडा क्षेत्रातील गुणांना वाव मिळावा, यासाठी कर्जत येथे कबड्डी स्पर्धांचे आयोजन जितेंद्र पाटील आणि प्रवीण दत्तात्रेय बोराडे यांनी कर्जतजवळील हालीवली येथे 10 व 11 फेब्रुवारी दरम्यान जिल्हा व तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मनसे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते. 

या वेळी बोलताना नांदगावकरांनी कबड्डी स्पर्धेचे आयोजन उत्कृष्ट असल्याचे सांगितले. तसेच कबड्डी हा मराठी मातीतला रांगडा खेळ असून तो मॅटवर खेळला जातोय, याची खंत व्यक्त केली. 

या वेळी मनसे रायगड जिल्हा व विविध शाखांच्या वतीने नांदगावकर यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेलेले माजी आमदार देवेंद्र साटम, रेल कामगार सेनेचे सुनील हर्षे, जिल्हा सचिव प्रवीण गांगल, महेश जाधव, जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, उपजिल्हाध्यक्ष जे. पी. पाटील, उप-तालुकाध्यक्ष प्रवीण बोराडे, विलास डुकरे, कर्जत तालुका सहसचिव प्रदीप पाटील, खोपोली शहराध्यक्ष अनिल मिंडे, नेरळ शहर अध्यक्ष मिलिंद मिसाळ, कर्जत शहराध्यक्ष योगेश पोथरकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, खेळाडू व कबड्डी रसिक उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com