neetesh rane mla congress | Sarkarnama

आजचा वाढदिवस ः नीतेश नारायण राणे, आमदार कणकवली, संस्थापक, स्वाभिमानी संघटना.

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 जून 2017

नीतेश नारायण राणेंची कॉंग्रेसमधील एक युवा व आक्रमक नेतृत्व म्हणून महाराष्ट्राला ओळख आहे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे ते चिरंजीव आहेत. सातत्याने शिवसेनेला विशेषतः: ठाकरे परिवार आणि मातोश्रीवर टीका करण्यात नीतेश राणेंची आक्रमकता आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वत्र मोदी वारे वाहत असताना कणकवली विधानसभा मतदारसंघातून 25 हजाराच्या मताधिक्‍क्‍याने ते विजयी झाले आहेत. राजकीय कार्यासोबत त्यांनी सामाजिक कार्यातही स्वतः:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. स्वाभिमान या संघटनेचे ते संस्थापक असून संघटना बांधणींचा त्यांचा स्वतंत्र अनुभव आहे.

नीतेश नारायण राणेंची कॉंग्रेसमधील एक युवा व आक्रमक नेतृत्व म्हणून महाराष्ट्राला ओळख आहे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे ते चिरंजीव आहेत. सातत्याने शिवसेनेला विशेषतः: ठाकरे परिवार आणि मातोश्रीवर टीका करण्यात नीतेश राणेंची आक्रमकता आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वत्र मोदी वारे वाहत असताना कणकवली विधानसभा मतदारसंघातून 25 हजाराच्या मताधिक्‍क्‍याने ते विजयी झाले आहेत. राजकीय कार्यासोबत त्यांनी सामाजिक कार्यातही स्वतः:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. स्वाभिमान या संघटनेचे ते संस्थापक असून संघटना बांधणींचा त्यांचा स्वतंत्र अनुभव आहे. ते व्यावसायिक असून त्यांनी एमबीएपर्यत शिक्षण घेतले आहे. वडील नारायण राणे यांना मदत करण्यासाठी नीतेश राणेंनी राजकारणात प्रवेश केला.

स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात नीतेश राणेंनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून स्वाभिमान संघटनेने राज्यात अनेक रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले आहे. त्यांनी 8 ऑक्‍टोबर 2011 मध्ये मुंबईतील कामगार मैदान इथे आयोजित केलेला रोजगार मेळावा सर्वात मोठा होता. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला या मेळाव्याची दखल घेणे भाग पडले, ज्यामध्ये शारीरिक व्यंग असलेल्यांसह 25 हजारापेक्षा जास्त बेरोजगार युवकांना नोकऱ्या देण्यात आल्या.

नारायण राणेंसारखाच नीतेश राणेंचा राजकारण व समाजकारणात आक्रमक पिंड आहे. स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आपले करिअर सुरु केले. त्यात त्यांनी बेरोजगारी, आरोग्य सेवा, महाराष्ट्रातील मूलभूत सुविधा, आणि मुख्यतः मुंबईतील सामाजिक समस्यांचे निवारण याला प्राधान्य दिले. 

संबंधित लेख