neelam rane and police | Sarkarnama

अनधिकृत बांधकाम : नीलम राणेंसह तीस जणांविरोधात अटक वॉरंट

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 जुलै 2018

सातारा : महाबळेश्‍वर येथील तीस अनाधिकृत बांधकाम प्रकरणी नवी दिल्लीतील फरिदाबाद न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची पत्नी नीलम राणे यांचा समावेश आहे. त्यांची क्षेत्रमहाबळेश्‍वर परिसरात मालमत्ता आहे. याबाबतचे न्यायालयाचे आदेश महाबळेश्‍वर पोलिसांना मिळाले आहेत. स्थानिक प्रशासकिय अधिकाऱ्यांना हाताशी धरून महाबळेश्‍वर येथे नैसर्गिक दृष्ट्या संवेदनशिल भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे होत आहेत. याविरोधात पर्यारण प्रेमींनी हरित लवादाकडे दाद मागितली होती. त्यानुसार लवादाने संबंधित अनाधिकृत बांधकाम केलेल्यांना कारणे दाखवा नोटीस बाजावले होते. 

यानंतर हरित लवादाच्या सर्वोच्च न्यायालयाने महाबळेश्‍वर परिसरात अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी तीस जणांविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. याबाबतचे आदेश महाबळेश्‍वर पोलिस ठाण्यात आले आहेत. या आदेशात नारायण राणे यांची पत्नी नीलम राणे यांचे न अन्य लोकांची नावे आहेत. प्रल्हाद नारायणदास राठी (रा. क्षेत्र महाबळेश्‍वर), मनोहर रामचंद्र शिंदे, संतोष हरिभाऊ जाधव, गिनात्री अशोक भोसले (सर्व कुंभरोशी), आर्ची डॅनियल डिसोजा, खेमाजी, नादजी पटेल, अतुल चिंतामणी साळवी, संदीप नंदकुमार साळवी, चंद्रशेखर चंद्रकांत साबणे (सर्व मेटतळे), आसावरी संजीव दातार (रा. दरे), महेश बाबुलाल पांचाळ, चांद मोहम्मद वाईकर, सलिम उस्मान वाईकर (सर्व रा. नाकिंदा), शिरिष मधुसूदन खैर, खुर्षिद इस्माईल अनसारी, सदानंद महादेव करंदीकर, विठ्ठल बाबू दुधाणे (सर्व रा. खिंगर), विठ्ठल दगडू गोळे, शांताराम परबती गोळे, केशव धोंडीबा गोळे (रा. भोसे), सुनील मोहन रेड्डी (रा. मेटगुताड), पुजा गजानन पाटील (रा. अवकाली), संग्रामसिंह अप्पासाहेब नवले (रा. भेकवली), मनिषा संतोष शेडगे (रा. शिंदोला) या सर्वांवर अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी हरित लवादाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. तसेच त्यांना 30 जुलैला न्यायालयात हजर करण्याचे आदेशही महाबळेश्‍वर पोलिसांना दिले आहेत. या प्रकारामुळे महाबळेश्‍वर परिसरात अनाधिकृत बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

संबंधित लेख