Neelam gorhe appointed president on special rights commitee | Sarkarnama

डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष हक्क समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

मुंबई  : विधान परिषदेच्या विशेष हक्क समितीच्या प्रमुख म्हणून शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे  यांची नियुक्‍ती करण्यात आली असून, अन्य पाच आमदारांची वर्णी अन्य समित्यांवर केली आहे. 

डॉ. गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या विशेष हक्क समितीवर दीड वर्षापूर्वी नियुक्‍ती करण्यात आली होती . आता त्यांना समितीचे प्रमुख पॅड देण्यात आले आहे . या व्यतिरिक्त विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समिती, अंदाज समिती, ग्रंथालय समिती, आणि अशासकीय विधेयक व ठराव समितीच्या सदस्य म्हणून त्या काम पाहणार आहेत. 

विधान परिषदेच्या समित्यांवरील अन्य नियुक्‍त्या अश्या  : 
ऍड. अनिल परब : कामकाज सल्लागार समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, सदस्य अनुपस्थिती समिती, नियम समिती, अशासकीय विधेयक व ठराव समिती, सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे ठेवणे समिती. 

तानाजी सावंत : पंचायत राज समिती, विनंती अर्ज समिती, आहार व्यवस्था समिती 

रवींद्र फाटक : उपविधान समिती, विशेष हक्क समिती, सदस्य अनुपस्थिती समिती 

गोपीकिशन बाजोरिया : आश्वासन समिती, अनुसूचित जमाती कल्याण समिती, आमदार निवास व्यवस्था समिती, माजी सदस्यांचे निवृत्तिवेतन समिती. 

विधानसभेच्या समित्यांवरील नियुक्‍त्या : 
अनिल कदम   : अंदाज समिती प्रमुख 

विजय औटी     : उपविधान समिती प्रमुख 

सुभाष साबणे  :  इतर मागासवर्गीय कल्याण समिती   प्रमुख 

जयप्रकाश मुंदडा   : आश्वासन समिती 

राजन साळवी   : अशासकीय विधेयके व ठराव समिती 

संबंधित लेख