Nearly 70 percent polling for Nagar Municipal Corporation | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

नगर महापालिकेसाठी सुमारे ७० टक्के मतदान

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 डिसेंबर 2018

नगर महापालिकेसाठी आज सुमारे ७० टक्के मतदान झाले. मतदानाची आकडेवारी संकलित करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे ही आकडेवारी निश्चित झाली नव्हती. उद्या (सोमवारी) मतमोजणी होणार आहे.

नगर : नगर महापालिकेसाठी आज सुमारे ७० टक्के मतदान झाले. मतदानाची आकडेवारी संकलित करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे ही आकडेवारी निश्चित झाली नव्हती. उद्या (सोमवारी) मतमोजणी होणार आहे.

महापालिकेसाठी आज सकाळपासून काही ठिकाणी तणावपूर्ण वातावरणात मतदान सुरू होते. सकाळी गर्दी कमी होती. दुपारी तीननंतर मात्र मतदारांच्या रांगा लागल्या. केडगाव परिसरात पोलिस बंदोबस्त कडक होता. निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

काल शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काही गडबड होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष पथक नियुक्त केले होते. काही केंद्रांवर पोलिसांनी मतदारांना हाणमार केली. कोणताही गुन्हा दाखल नसतानाही एका पत्रकाराला मारहाण करून डांबल्याच्या निषेधार्थ सर्व पत्रकारांनी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. 

याबरोबरच ड्युटीवर असलेल्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांना दहा लाखाची मदत जाहीर करण्यात आली. मतदान केंद्रावर एक लाख तीन हजार रुपये देताना एकास पोलिसांनी पकडले. त्याच्यावर कारवाई करण्याचे काम सुरू होते.
 

संबंधित लेख