ncp`s action in purandar against bapat and shivtare | Sarkarnama

बापट आणि शिवतारेंवर राष्ट्रवादीची पुरंदरमध्ये कुरघोडी

तानाजी झगडे
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

जेजुरी : जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधिकृत उद्घाटन शनिवारी (ता. ८) होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काॅंग्रेसने कुरघोडी करत त्याचे उदघाटन केले. प्रोटोकाॅलचा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या पुणे जिल्हा परिषदेला पालकमंत्री गिरीश बापट यांनी धारेवर धरले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीने आज बापट आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांना आव्हान दिले.

राज्याचे आरोग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उदघाटन होणार होते. तेरा कोटी रुपये या रुग्णालयासाठी खर्च झाला आहे. पुरंदरचे आमदार आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी तीन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर कडवट टीका केली होती. त्याचाही निषेध राष्ट्रवादीने या निमित्ताने केला.

उदघाटनाच्या कार्यक्रमाला पक्षीय स्वरूप दिले जात असल्याचा निषेध राष्ट्रवादी काॅंग्रेसने केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य सरचिटणीस जालिंदर कामठे व उपनगराध्यक्ष गणेश निकुडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

अजित पवार पालकमंत्री असताना व अशोक टेकवडे आमदार असताना हे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले. त्यानंतर अजित पवार यांनी यासाठी अनेक वेळा निधी दिला आहे. या कामासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केला आहे. जेजुरी पालिकेने या इमारतीसाठी जागा दिली असताना कोणालाही विश्वासात न घेता उदघाटनाला पक्षीय स्वरूप दिले जात असल्याचे जालिंदर कामठे यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी विकास कामे करताना सर्वांना बरोबर घेतले पाहिजे असे विजय कोलते यांनी सांगितले.

जेजुरी पालिकेने ग्रामीण रुग्णालयासाठी सांगेल त्यावेळी वेळोवेळी ठराव करून दिले आहेत.लागेल तेवढी जागाही उपल्बध करून दिली आहे असे असताना पालिकेला अदल्या दिवशी फक्त पत्रिका पाठविली जाते. पालिकेला कसलेही विश्वासात घेतले जात नाही.त्यामुळे निषेध म्हणून उदघाटन करीत असल्याचे गटनेते सचिन सोनवणे यांनी सांगितले.
                      
संबंधित लेख