NCP Youth Vikrant Jadhav is preparaing for which post ? | Sarkarnama

राष्ट्रवादी युवक विक्रांत जाधव कशाची तयारी करीत आहेत ? 

मुझफ्फर खान 
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

विक्रांत जाधव विधानसभेची  तयारी करीत आहेत का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे .  मात्र ही तयारी २०१९ साठी आहे की २०२४ साठी असा प्रश्नही विचारला जात आहे . 

चिपळूण :   राष्ट्रवादी युवक काँग्रेसची युवा फळी प्रदेश उपाध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली सक्रीय झाली आहे. जिल्हास्तरीय संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने प्रदेश उपाध्यक्ष विक्रांत जाधव यांनी युवा फळीत तुफान भरले आहे.त्यामुळे विक्रांत जाधव कशाची तयारी करीत आहेत ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे . 

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करताना विक्रांत जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्‍नांवर आंदोलने केली. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय, कोकण कृषी विद्यापीठावर मोर्चे काढले. जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था चालकांच्या भेटी घेवून शैक्षणिक शुल्क, वस्तीगृह आणि इतर प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. 

त्याची दखल घेवून पक्ष विक्रांत जाधव यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद देईल असे वाटले होते. जाधव यांची अनपेक्षितपणे राष्ट्रवादी युवकच्या प्रदेश उपाध्यक्षपदी बढती देवून पक्षाने सर्वांना सुखद धक्का दिला. त्यानंतर आज त्यांनी जिल्ह्यातील युवकांचा पहिला संकल्प मेळावा चिपळूण येथे घेतला. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे युवकचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर मेळाव्याला उपस्थित राहिले. 

त्यामुळे मार्कंडी येथील सभागृहाबाहेर वाहने पार्कींगसाठी जागाच शिल्लक राहिली नाही राष्ट्रवादीची फादर बॉडी म्हणजेच आमदार भास्कर जाधव, संजय कदम, पक्षाचे सरचिटणीस शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव सरकारविरोधी हल्लाबोल करत असताना विक्रांत जाधव यांनी राष्ट्रवादीच्या युवकांना मेळाव्याच्या निमित्ताने मोठे शक्ती प्रदर्शन केले होते . 

सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने दिलेली आश्‍वासने आणि सध्या देशात असलेली स्थिती जाधव यांनी चव्हाट्यावर आणली. प्रदेशाध्यक्ष संग्राम कोलते पाटील यांच्या साक्षीने पुन्हा एकदा राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचा संकल्प त्यांनी मेळाव्यात केला. 

विक्रांत जाधव विधानसभेची  तयारी करीत आहेत का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे .  मात्र ही तयारी २०१९ साठी आहे की २०२४ साठी असा प्रश्नही विचारला जात आहे . 

संबंधित लेख