ncp youth | Sarkarnama

भाजप नेत्यांच्या डोळ्यावर सत्तेचा धूर : कोते-पाटील 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मे 2017

राष्ट्रवादी शहर कॉंग्रेसला गटबाजीचे ग्रहणच लागले आहे. आजच्या बैठकीतही ते स्पष्ट झाले. युवक राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यासह समर्थकांनी बैठकीकडे पाठ फिरवली. 

सांगली :  केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपमधील नेत्यांच्या डोळ्यावर सत्तेचा धूर आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्‍तव्याने तर कहर केला, अशी टीका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी केली. 

राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. श्री. कोते-पाटील म्हणाले,""सत्ताधारी भाजपच्या अपयशाबद्दल सामन्यांमध्ये नाराजी आहे. संधीचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादी युवकांनी पुढाकार घ्यावा. विरोधात आहोत याचेच भान अजूनही काहींना आलेले नाही. शेतीमालाचा भाव, शेतकरी आत्महत्या, शेतीकर्जमाफीबद्दल राज्य आणि जिल्हास्तरावरील सर्व घडामोडी ग्रामीण कार्यकर्त्यांनी सर्वमान्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. जनजागृती आणि उठावासाठी आंदोलन, मोर्चा याला पर्याय नाही. तसे केले तरच आगामी महापालिका, विधानसभा निवडणुकीत भाजपला हिसका दाखवू शकतो.'' 

 

संबंधित लेख