कर्जतमध्ये 'रोहित इफेक्ट'; राष्ट्रवादीने 'कोरेगाव' जिंकले!

या निवडणुकीत अपक्ष उमेदवार शीतल धांडे या जायंट किलर ठरल्याची सर्वत्र चर्चा आहे.
कर्जतमध्ये 'रोहित इफेक्ट'; राष्ट्रवादीने 'कोरेगाव' जिंकले!

कर्जत (नगर) : कर्जत पंचायत समितीच्या कोरेगाव गणातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या मनिषा जाधव यांनी प्रतिस्पर्धी भाजपच्या शशिकला शेळके यांच्यावर विजयी मिळविला. हा विजय राष्ट्रवादी काँग्रेससाठी ऊर्जा देणारा, तर सत्ताधारी भाजपसाठी आत्मचिंतन करण्यास लावणारा ठरला आहे. 

यामुळे युवक नेते रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदार संघातील संभाव्य उमेदवारीला उभारी मिळणार असून, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या वर्चस्वाला धक्का देणारा ठरला आहे.

तत्कालीन सभापती व या गणाच्या सदस्या पुष्पा शेळके या तिसरे अपत्य असल्याच्या आक्षेपामुळे अपात्र ठरल्याने येथे पोट निवडणूक झाली. सुरुवातीला छाननीच्या वेळेस भाजप च्या उमेदवार शेळके यांनी राष्ट्रवादी च्या उमेदवार जया शेळके यांच्यावर तिसरे अपत्य असल्याचा आक्षेप घेतला. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी माळी यांनी फेटाळून लावत उमेदवारी कायम ठेवली. त्यांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली. अखेर पुरावा सादर केल्यानंतर राष्ट्रवादी च्या उमेदवार जया शेळके यांची उमेदवारी न्यायालयाने बाद ठरवली. राष्ट्रवादीला उमेदवार बदल करीत मनीषा जाधव यांना संधी मिळाली. सत्ताधारी भाजपच्या वतीने स्थानिक नेत्यांच्या बरोबर पालकमंत्री राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे यांची, तर राष्ट्रवादी च्या वतीने युवा नेते रोहित पवार यांची प्रचाराच्या पत्रकावर छबी झळकली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com