कर्नाटकमध्ये काँग्रेसला राष्ट्रवादीचा  बिनशर्त पाठिंबा -  डी. पी. त्रिपाठी 

NCp-PC DP Tripathi
NCp-PC DP Tripathi

मुंबई :  कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला राष्ट्रवादीचा बिनशर्त पाठिंबा असेल, असे  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते डी. पी. त्रिपाठी यांनी  जाहीर केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस या निवडणुकीत उमेदवार उभा करणार नाही. पक्ष कॉंग्रेसच्या निवडणूक प्रचारात सहभागी होईल, असेही  त्रिपाठी यांनी सांगितले. या निर्णयामुळे कर्नाटकातील सीमावर्ती भागात कॉंग्रेसला फायदा होण्याची शक्‍यता आहे. मागील निवडणुकांत राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभेच्या सहा जागा लढवल्या होत्या.

" देशभरातील इतर राज्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महाराष्ट्रातही कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय लवकर घ्यावा,"  असे आवाहन  डी. पी. त्रिपाठी यांनी गुरुवारी केले. पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

केंद्रातील भाजप सत्तेविरोधात सामान्य नागरिकांत तीव्र संताप असल्याचे सांगून त्रिपाठी म्हणाले," लोकशाही परंपरा, राष्ट्रीय शांतता आणि सलोखा अबाधित राखण्यासाठी मोदी सरकार घालवायला हवे. त्यासाठी सर्व राज्यांतील विरोधी पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. "

" उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची आघाडी झाली आहे. प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी, ओडिशामध्ये नवीन पटनाईक, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल हे प्रमुख पक्ष मोदी सरकारविरोधात एकवटले आहेत. महाराष्ट्रातही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपविरोधात एकत्र येण्याची घोषणा केली आहे. आघाडीबाबतचा अंतिम निर्णय कॉंग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी तातडीने घ्यायला हवा. "
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com