NCP will fight till loan waiver for farmers is declared - Tatkare | Sarkarnama

राष्ट्रवादीचा वर्धापनदिन बळीराजाला समर्पित ; कर्जमाफी होत नाही तोपर्यंत संघर्ष -  तटकरे 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 जून 2017

मुंबई: कर्जमाफी व शेतमालाला हमी भाव यासाठी सरकारच्या धोरणांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गुंड म्हणणे ही सरकारची घमेंड असल्याची आक्रमक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली.

राष्ट्रवादीच्या 18 व्या वर्धापन दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

मुंबई: कर्जमाफी व शेतमालाला हमी भाव यासाठी सरकारच्या धोरणांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गुंड म्हणणे ही सरकारची घमेंड असल्याची आक्रमक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली.

राष्ट्रवादीच्या 18 व्या वर्धापन दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

राज्यभरातला शेतकरी सरकारच्या शेतकरी धोरणां विरोधात रस्त्यावर उतरला आहे. मात्र, यामधे खरे शेतकरी नाहीत. राजकीय गुंड आहेत. असे म्हणून सरकारने शेतकऱ्यांचा अवमान केल्याचा आक्षेप तटकरे यांनी घेतला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करणार असेल तर शेतकरी हा राष्ट्रवादीचा असू शकत नाही काय ? असा सवालही त्यांनी केला. 

दरम्यान, राष्ट्रवादीचा यंदाचा वर्धापन दिन हा बळीराजाला समर्पित करण्यात आला असून, उद्‌या सरकारला बळीराजाची सनद देण्यात येणार असल्याची माहीती त्यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांना हक्‍क मिळवून देणे ही राष्ट्रवादीचे उत्तरदायीत्व असून, जोपर्यंत कर्जमाफी व इतर सर्व मागण्या सरकार पुर्ण करत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही तटकरे यांनी दिला. 

उद्‌या नवी दिल्ली मधे राष्ट्रवादीचा वर्धापन दिन कार्यक्रम होणार असून, महाराष्ट्रात प्रत्येक तालुका व जिल्हास्तरावर महापुरूषांना अभिवादन करून तहसिलदार व जिल्हाधिकाऱ्यांना बळीराजाची सनद दिली जाईल. तर मुंबईत मंत्रालयात मुख्य सचिवांना ही सनद दिली जाईल, असे ते म्हणाले. 

 11 जून पासून राज्यव्यापी दौरा
दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्व नेते 11 जून पासून राज्यव्यापी दौऱ्यावर जाणार असून पक्षसंघठन मजबूत करण्यासाठी राज्यभरात बुथ स्तरापासूनची बांधणी करणार असल्याची माहीती तटकरे यांनी दिली. 11 ते 18 जून दरम्यान मराठवाड्‌यातून हा दौरा सुरू होणार आहे. त्यानंतर 22 ते 25 जून मधे उत्तर महाराष्ट्र, जुलैच्या पहिल्या आठवड्‌यात कोकण व पश्‍चिम महाराष्ट्र व त्यांनतर विदर्भात हे नेते जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

संबंधित लेख