NCP urban cell will focus on urban amenities | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

राष्ट्रवादी अर्बन सेलचा भर शहरी नागरी समस्यांवर :  वंदना चव्हाण

सुरेंद्र चापोरकर 
गुरुवार, 7 मार्च 2019

आता राष्ट्रवादी अर्बन सेलच्या माध्यमातून शहरी भागातील नागरी समस्यांवर 'फोकस' करण्यात येणार आहे.

-अर्बन सेलच्या अध्यक्ष खासदार वंदना चव्हाण

अमरावती  :  राज्यातील विविध महापालिकाक्षेत्रांतर्गंत नागरिकांना आवश्‍यक असलेल्या मुलभूत सुविधा आजवर उपलब्ध होवू शकल्या नाहीत. हा मुद्दा कायम दुर्लक्षित राहत असल्याने आता राष्ट्रवादी अर्बन सेलच्या माध्यमातून शहरी भागातील नागरी समस्यांवर 'फोकस' करण्यात येणार आहे. त्यासाठी निवेदने, मोर्चा, आंदोलनांचे शस्त्र उगारले जाणार असल्याची माहिती अर्बन सेलच्या अध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी  येथे दिली.

वंदना चव्हाण यांनी सांगितले, " राज्यातील अनेक महापालिकांक्षेत्रामध्ये अनेक विकासात्मक प्रयोग होत आहेत. त्याच धर्तीवर आपल्या क्षेत्रातील महापालिकांमध्ये प्रयोग करता येईल का याची चाचपणी सेलच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यासाठी शहरस्तरावर 25 पदाधिकाऱ्यांची टीम गठित केली जाणार आहे. अनेक महापालिकाक्षेत्रांमध्ये आजही मुलभूत सुविधांची वानवा आहे. त्या पूर्ण करण्यासाठी सेलच्या माध्यमातून पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते काम करतील."

"  महिलांसाठी सार्वजनिक प्रसाधन गृह, आरोग्याच्या सोयी सुविधा, सार्वजनिक प्रसाधनगृहांमधील अस्वच्छता, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या यांसह 26 मुद्यांना घेऊन अर्बन सेल काम करणार आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी किंवा एखादा नवीन प्रयोग शहरात राबविण्यासाटी प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन देवून तसेच गरज पडल्यास आंदोलनाच्या माध्यमातून सेलचे काम सुरू राहणार आहे ,"असे  खासदार चव्हाण यांनी सांगितले. 

यावेळी उपाध्यक्ष आमदार विद्या चव्हाण, प्रदेश सचिव सुरेश पाटील , राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव तथा जि.प.च्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत महल्ले, सुचित्रा वनवे, अविनाश मार्डीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
 

संबंधित लेख