NCP Upset over Hire Sanjay Raut Meeting | Sarkarnama

संजय राऊत- हिरे भेटीने राष्ट्रवादीत धावाधाव? 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

भाजपचे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे लोकसभा आणि नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार आहेत. त्यांनी ही भूमिका जाहिरपणे मांडली आहे. त्यासाठी भाजपकडेही दावा केला होता. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी तीन महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यात सबंध जिल्ह्यातील हिरे समर्थक डॉ. हिरे यांच्या वाढदिवशी 2 ऑगष्टला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे निश्‍चित झाले होते.

नाशिक : माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, अद्वय हिरे आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. मात्र, गेल्या आठवड्यात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी हिरे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यामुळे नाशिकच्या राजकीय क्षेत्रात तो चर्चेचा विषय ठरला. या भेटीचे गुपीत अन्‌ फलीत दोन्ही अधांतरी आहे. या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र धावाधाव सुरु झाली आहे. 

भाजपचे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे लोकसभा आणि नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार आहेत. त्यांनी ही भूमिका जाहिरपणे मांडली आहे. त्यासाठी भाजपकडेही दावा केला होता. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी तीन महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यात सबंध जिल्ह्यातील हिरे समर्थक डॉ. हिरे यांच्या वाढदिवशी 2 ऑगष्टला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे निश्‍चित झाले होते. मात्र माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार देवीदास पिंगळे, स्थानिक पदाधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनाचे वातावरण निवळण्यापर्यंत प्रवेश लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला होता. 

दरम्यान, चार दिवसांपूर्वी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी हिरे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. शिवसेनेत प्रस्थ असलेल्या सिडकोतील एका नगरसेवकाने ही भेट घडवुन आणल्याची चर्चा आहे. या भेटीत काय घडले याची माहिती अद्याप बाहेर पडलेली नाही. मात्र, या भेटीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांत चलबिचल झाली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून दबावतंत्राचा भाग असलेल्या या भेटीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धावाधाव सुरु झाल्याचे चित्र असल्याचे कळते. 

शिवसेनेत सर्व निर्णय पक्षप्रमुख घेतात. नेतेमंडळी त्याविषयी कार्यवाही करतात. त्यामुळे मी याविषयी काहीही सांगू शकत नाही : सुधाकर बडगुजर, शिवसेना नेते. 

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख