पुणे लोकसभेसाठी राष्ट्रवादी अद्याप आग्रही : दोन्ही काॅंग्रेसच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात  

पुणे लोकसभेसाठी राष्ट्रवादी अद्याप आग्रही : दोन्ही काॅंग्रेसच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात   

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पुण्याच्या लोकसभेच्या जागेसाठी अजूनही आग्रही असून कॉंग्रेसबरोबर झालेल्या जागा वाटपाच्या चर्चेत पक्षाने पुण्याच्या जागेचा हट्ट कायम ठेवला आहे. त्यासाठी गेल्या विधानसभा व महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या मतांच्या आकडेवारीचा आधार देण्यात आला आहे. जागा वाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसमध्ये मुंबईत झालेल्या बैठकीत तीन-चार मतदारसंघ वगळता इतर जागांबाबत एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

पुण्यातून स्वत: शरद पवार लढणार या चर्चेला पवार यांनीच पूर्णविराम दिल्याने ती चर्चा आता पूर्ण बंद झाली आहे. पुण्याच्या गेल्या दहा वर्षातील स्थित्यंतराचा आढावा घेतला तर सुरेश कलमाडी यांच्यानंतर कॉंग्रेसकडे त्या क्षमेतचा सक्षम उमेदवार उरला नाही. कलमाडी यांच्यानंतर पुण्यात कॉंग्रेसची सातत्याने पीछेहाट होत आली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दहा वर्षात पुण्यात राष्ट्रवादीची ताकद वाढत गेली आहे. त्यासाठी विधानसभा व महापालिकेच्या निवडणुकांमधील मतांची आकडेवारी स्पष्टपणे दिसत आहे.

दुसरीकडे पुणे हा कॉंग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून जिल्ह्यातील लोकसभेची एकमेव जागा पक्षाकडे असल्याने कॉंग्रेस ही जागा सोडायला तयार नाही. पुण्यात राष्ट्रवादीची ताकद आहे. मात्र त्यांच्याकडे खासदार होण्याच्या क्षमतेचा उमेदवार नाही, मात्र आमच्याकडे सक्षम उमेदवार असल्याचे पक्षाचे नेते अजित पवार यांनी यापूर्वी अनेकवेळा जाहीरपणे सांगितले आहे. 

राष्ट्रवादीला खरोखच पुण्याची जागा मिळाली तर पुण्याच्या माजी शहराध्यक्ष व विद्यमान राज्यसभा सदस्य वंदना चव्हाण यांचे नाव पुढे येऊ शकते. या शिवाय अन्य अनेक इच्छुक तयार होऊ शकतात. मात्र यात सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे पुण्याची जागा मागताना अजित पवार यांच्या डोक्‍यात नेमता कोण उमेदवार आहे. याबाबत विविध अंदाज बांधण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रवादीशी संबंधित बांधकाम व्यावसायिक तसेच इतर काही अनपेक्षित नावे येऊ शकतात, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com