राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार ? शशिकांत शिंदे ,वळसे ,जयंत पाटील यांची नावे चर्चेत 

सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याचे विश्वसनीय वृत्त आहेत. यामध्ये प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाण्याची शक्यता आहे .त्यासाठी दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत कोरेगावचे आमदार व विधानसभेतील प्रवक्ते शशिकांत शिंदे यांची नावे विचाराधीन असल्याचे समजते .
NCP-State-president
NCP-State-president

सातारा  : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याचे विश्वसनीय वृत्त  आहेत. त्यासाठी येत्या 29 एप्रिलला पुण्यात बैठक होणार आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाण्याची शक्यता आहे  .त्यासाठी दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत कोरेगावचे आमदार व विधानसभेतील प्रवक्ते शशिकांत शिंदे यांची नावे विचाराधीन असल्याचे समजते . 

त्यामुळे या निवडीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आमदार शिंदेंचे नाव चर्चेत आले असून सातारा जिल्ह्यावर असलेले शरद पवारांचे प्रेम लक्षात घेता या निवडीत सातारा जिल्ह्याला झुकते माप दिले जाईल अशी अपेक्षा सातारा जिल्ह्यातील  राष्ट्रवादी काँग्रेसच्या  पदाधिकाऱ्यांना आहे .

आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांत खांदेपालट आणि फेरबदल होणार आहेत. सध्या सुनील तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद आहे. पण  शरद पवार यांनी भाकरी फिरविण्याची  तयारी केली आहे,असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळात बोलले जाते . आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहे.

त्यानुसार माजी मंत्री जयंत पाटील, कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे आणि विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांची नावे पुढे आहेत. यापैकी सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे आमदार व सध्याचे विधानसभेतील राष्ट्रवादीचे प्रवक्ते शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष पदावर संधी मिळावी, अशी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची अपेक्षा आहे. 
 

राज्यात भाजप शासन सत्तेवर आले तरी सातारा जिल्ह्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ सोडलेली नाही. आजही सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. आमदार शिंदेंचे अन्य नेत्याप्रमाणेच  अजित पवार,   शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे चांगले  संबंध आहेत.
 

आता जिल्ह्यातील विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकरांसह पक्षाच्या आमदारांनी पक्षश्रेष्टींकडे भुमिका मांडणे गरजेचे आहे. तरच आमदार शिंदेंना प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोहोचणे  शक्‍य ाहोणार  आहे. आता शरद पवार सांगली की साताऱ्याकडे पक्षाची राज्याची धुरा देणार याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com