ncp state president jayant patil comment about udyanraje nature | Sarkarnama

उदयनराजेंच्या स्वभावाला औषध नाही!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

त्यांच्या मनात काही पक्षविरोधी विचार असेल असे वाटत नाही.

इस्लामपूर (सांगली): 'काहींचा स्वभाव असतो, त्याला औषध नसते. त्यांच्याविषयी नेहमी गैरसमज पसरवले जातात. त्यांच्या मनात काही पक्षविरोधी विचार असेल असे वाटत नाही', अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी उदयनराजे यांच्याविषयीची भूमिका स्पष्ट केली.

सरकारच्या निषेधार्थ इस्लामपुरात काढलेल्या मोर्चानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गेले काही दिवस राष्ट्रवादी पक्ष व खासदार उदयनराजे यांच्यात संघर्ष सुरू आहे. याविषयी विचारल्यावर ते म्हणाले, खासदार उदयनराजे यांच्याविषयी योग्य वेळ येताच पक्ष आणि शरद पवारसाहेब निर्णय घेतील.

संबंधित लेख