ncp state president jayant patil appeals prakash ambedkar | Sarkarnama

प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीबरोबर यावे:  जयंत पाटील 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

बाबासाहेबांचे स्मारक तयार करताना सरकार गहाण ठेवण्याची भाषा करते. म्हणजे सरकारचा कारभार डबघाईला आला आहे.

- जयंत पाटील, राष्ट्रवादी

नवी मुंबई : भारिपसारख्या समविचारी पक्षाने राष्ट्रवादी आणि आघाडीसोबत यायला पाहिजे. हे पक्ष जर वेगवेगळे लढले तर त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. 

नवी मुंबईतील वाशी मध्ये विष्णुदास भावे नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजित कार्यकर्ता मेळाव्यानिमित्ताने पाटील यांनी पत्रकरांसोबत संवाद साधला. 

राज्यभरातील इतर स्मारके करताना सरकार वारेमाप पैसे वाटत आहे. मात्र बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यासाठी या भाजपला सरकारला गहाण ठेवावे लागते. याचा अर्थ सरकारला बाबसाहेबांचे स्मारक तयार करण्याची इच्छा नाही, अशी टीका पाटील यांनी केली.

येणाऱ्या निवडणूका लक्षात घेत पक्षांतर्गत बूथ कमिटी मजबूत असणे गरजेचे असल्याने बूथ कामिट्या निवडण्याचे आदेश पाटील यांनी दिले.  

संबंधित लेख