NCP to start State wide campaign | Sarkarnama

शनिवारपासून 'राष्ट्रवादीचे गाव तिथे शाखा आणि गाव तिथे राष्ट्रवादीचा झेंडा' अभियान

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 जुलै 2017

22 जुलै रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा  वाढदिवस असून त्या दिवसाचे औचित्य 22 जुलै रोजी या राज्यव्यापी अभियानाची सुरुवात केली जाणार आहे. या अभियानात राज्यातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शाखा आणि राष्ट्रवादीचा झेंडा पोहोचविला जाणार आहे.

मुंबई : राज्यातील युवक, शेतकरी, महिला, कामगार, बेरोजगार आदींना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराने प्रेरित करण्यासाठी आणि राज्यातील प्रत्येक गावांमध्ये राष्ट्रवादीची शाखा निर्माण करण्यासाठी शनिवारी, 22 जुलैपासून राज्यात 'गाव तिथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शाखा, घर तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा' हे राज्यव्यापी अभियान राबविले जाणार आहे.

या अभियानाच्या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हे अभियान महिनाभर चालणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबतच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील राज्यभरात आपल्या युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज्यभर दौरा करणार आहेत. यासाठी राज्यव्यापी कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्यात आली असून या 'गाव तिथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शाखा, घर तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा' या कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यातील महाविद्यालयीन युवक-युवती, बेरोजगार युवकाना मोठ्या प्रमाणात एकत्र करण्यावर सर्वाधिक भर देण्यात आला असल्याची माहिती संग्राम कोते-पाटील यांनी दिली.

22 जुलै रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा  वाढदिवस असून त्या दिवसाचे औचित्य 22 जुलै रोजी या राज्यव्यापी अभियानाची सुरुवात केली जाणार आहे. या अभियानात राज्यातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शाखा आणि राष्ट्रवादीचा झेंडा पोहोचविला जाणार आहे. असून पक्षाचे पाळेमुळे गावखेड्यांपर्यंत अधिक घट्ट कार्यासाठी या अभियानात राष्ट्रवादीच्या 24 सेलचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेसचे पदधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होतील अशी माहितीही कोते-पाटील यांनी दिली.

संबंधित लेख