ncp satyajit patankar attack shambhuraj desai | Sarkarnama

खोटे बोल पण रेटून बोल हाच शंभूराज देसाईंचा फंडा, सत्यजितसिंह पाटणकरांचा घणाघात 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

ढेबेवाडी ( जि. सातारा) ः पाटणचे विद्यमान आमदार कोटींच्या विकास निधीची भाषा करत आहेत. त्याचा गाववार अभ्यास केल्यास कागदावरचेच आकडे असल्याचे लक्षात येत आहे. आमदारांच खोट बोल पण रेटून बोलचा फंडा निवडणूकीवरच डोळा ठेऊन सुरू आहे.' असा घणाघात पाटणचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे गुढेफाटा (ता. पाटण) येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

पाटणकर म्हणाले, "" खोटेपणा आणि फसवेगिरीचा उद्योग जास्त दिवस चालत नाही. साडेचार वर्षे उलटली तरी जनतेला अजूनही अच्छे दिन दिसलेले नाहीत. महागाईसह विविध समस्यांनी पिळलेली जनता आता रस्त्यावर उतरली आहे. पाटण तालुक्‍यातील विद्यमान आमदार कोटींच्या विकास कामांची भाषा करत आहेत. तालुक्‍यातील एका विभागात जाऊन दुसऱ्या विभागात विकास निधी आणल्याचा कांगावा करून जनतेला फसवायचा त्यांचा जुना उद्योग जनतेने आता ओळखला आहे. 

यावेळी शिक्षण सभापती राजेश पवार, जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश पाटील, पंचायत समितीचे सदस्य प्रतापराव देसाई, संगिता पुजारी आदी उपस्थित होते. 

 नरेंद्र पाटलांनी धोरण बदलले.... 
रमेश पाटील म्हणाले, 'माझे बंधू नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांच्या हितासाठी त्यांचे धोरण बदलले आहे. कामगार चळवळीचे नेतृत्व करताना असे निर्णय नेत्यांना घ्यावेच लागतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संभ्रमात पडण्याचे कारण नाही. त्यांनी कामगारांच्या हितासाठी धोरण बदलले असले तरी माझे धोरण बदलू शकत नाही, माझा राजकीय जन्म राष्ट्रवादीतच झाला आहे. ज्येष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर यांनी सतत माझी पाठराखण केली आहे. राष्ट्रवादीला ताकद देवून सत्यजीतसिंह पाटणकरांना आमदार बनविण्यासाठी जिवाचे रान करणार आहे '. 

संबंधित लेख