ncp satara morcha | Sarkarnama

तोंडाला काळी पट्टी बांधून राष्ट्रवादी महिलांचा मूकमोर्चा 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 जुलै 2017

कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेला एक वर्षे पूर्ण होऊनही अद्याप आरोपींना शिक्षा झालेली नाही. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी गुरुवारी राष्ट्रवादी महिला आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढून निषेध नोंदविला. 

सातारा : कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेला एक वर्षे पूर्ण होऊनही अद्याप आरोपींना शिक्षा झालेली नाही. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी गुरुवारी राष्ट्रवादी महिला आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढून निषेध नोंदविला. 

हातात निषेधाचे फलक आणि तोंडाला काळी पट्टी बांधून राष्ट्रवादी भवनापासून कार्याध्यक्षा जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मुकमोर्चा निघाला. पोवईनाका येथून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह 25 महिला कार्यकर्त्यांचा सहभाग होता. शहराध्यक्षा सुजाता घोरपडे, कविता मेनकर, नंदीनी जगताप, अलका मोरे, उषा जाधव, सिमा जाधव, कविता चव्हाण, वनिता कण्हेरकर, हेमा किर्वे, लतिका येवले, छाया कुंभार, सुरेखा पाटील, भारती काळंगे, मधु कांबळे, सारिता इंदलकर यांचा समावेश होता. 
 

संबंधित लेख