NCP Rasta Roko in Sangli | Sarkarnama

महामार्गावरील खड्डे; राष्ट्रवादी काँग्रेसने केला टोल नाका बंद! 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे त्वरीत दुरुस्त करावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज घोटी टोल नाका येथे रास्ता रोको केला. यावेळी काही वेळ टोल नाका बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी दहा ते बारा दिवसांत खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्‍वासन प्रशासनाने दिले. 

पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन झाले. गेले काही दिवस पावसामुळे हा महामार्ग मोठ्या प्रामणात नादुरुस्त झाला आहे. अनेक भागात खड्डे झाले. त्यामुळे वारंवार अपघात होता. गंभीर अपघातामुळे दोन महिलांना दुखापत झाली. त्याविरोधात गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतरही कारवाई न झाल्याने आज महामार्गावर घोटी टोल नाका येथे रास्ता रोको करण्यात आला. 

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दहा ते बारा दिवसांत रस्ता दुरुस्ती करण्यात येईल. खड्डे बुजविले जातील असे आश्‍वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. पंधरा दिवसांत खड्डे न बुजविल्यास टोल नाका बंद करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, अंबादास खैरे यांसह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. 

संबंधित लेख