राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदासाठी16 अर्ज : पण वंदना चव्हाणांना पर्याय मिळणार का ?

खासदार चव्हाण या गेली दहा वर्षे शहराध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे काम त्यांनी अतिशय कौशल्याने आणि चांगल्या पद्धतीने हाताळले आहे . त्यांची प्रतिमा स्वच्छ आणि चांगली राहिलेली आहे
Vandana-chavan.
Vandana-chavan.

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुण्याच्या शहराध्यक्षपदासाठी तब्बल 16 इच्छुकांचे अर्ज आले आहेत. येत्या 22 एप्रिलला राज्यातील सर्व जिल्हा  व शहराध्यक्षांच्या निवडीसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी निवडणुका घेण्याचे आदेश प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून देण्यात आले आहेत.

पुण्यात वंदना चव्हाण यांना पर्याय ठरेल असे नाव अजून राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आलेले नाही . त्यामुळे वंदना चव्हाण यांना पर्याय मिळणार का याबाबत उत्सुकता आहे . 

 निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असला तरी पुण्यासह प्रत्येक ठिकाणी ठराव करून नियुक्‍त्यांचे आधिकार पक्षाध्यक्ष शरद पवार यांना दिले जाण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, पुण्यात खासदार वंदना चव्हाण यांच्याजागी नव्या अध्यक्षांची नियुक्ती होणार की ही जबाबदारी पुन्हा चव्हाण यांच्याकडेच कायम ठेवणार याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.

खासदार चव्हाण या गेली दहा वर्षे शहराध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे काम त्यांनी अतिशय कौशल्याने आणि चांगल्या पद्धतीने हाताळले आहे . त्यांची प्रतिमा स्वच्छ  आणि चांगली राहिलेली आहे यापूर्वीदेखील पुण्यातील जबाबदारी बदलण्याचे प्रयत्न दोन वेळा झाले. पक्षाकडून इच्छुकांची नावे मागविण्यात आली. स्वत: खासदार चव्हाण यांनी ही नावे प्रदेशकडे पाठविली.

मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी चव्हाण यांनाच काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे खासदार चव्हाण या प्रदीर्घ काळ शहराध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. या काळात चव्हाण यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतीच त्यांची राज्यसभेच्या सदस्य म्हणून दुसऱ्यांदा निवड झाली आहे. त्यामुळे शहराध्यक्षपदाच्या बदलाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.

राज्यातील सर्व शहर व जिल्हाध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम 22 एप्रिलला पार पडल्यानंतर 29 एप्रिलला राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक होणार आहे. या बैठकीत राज्य पातळीवरील पदाधिकारी निश्‍चित करून घोषणा करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com