ncp public meeting in pimpri chinchwad | Sarkarnama

नातवाच्या प्रचाराचा नारळ आजोबा वाढविणार

उत्तम कुटे
शुक्रवार, 15 मार्च 2019

पहिली प्रचार सभा पार्थ यांच्यासाठी पवारसाहेब घेत आहेत. 

पिंपरी: मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शुक्रवारी जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस लगेच तयारीला लागली आहे. या मतदारसंघातील प्रचाराचा नारळ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे पिंपरी चिंचवडमधील सभेने शनिवारी (ता.१७) वाढविणार आहेत. त्यांचे नातू व अजित पवार यांचे पूत्र पार्थ तेथून रिंगणात आहे

मावळच नव्हे, तर राज्यातील आघाडी उमेदवाराच्या प्रचाराची ही पहिलीच सभा ठरणार आहे. पवार यांनीच प्रथम पार्थ यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. एवढेच नाही तर, त्याबाबतचा सस्पेन्स अगदी कालपर्यंत कायम ठेवला होता. मात्र, आज पार्थ यांची उमेदवारी जाहीर झाली व आजपर्यंत डिक्लेर करण्यात आलेल्या उमेदवारांतील पहिली प्रचार सभा पार्थ यांच्यासाठी पवारसाहेब घेत आहेत. 

संबंधित लेख