ncp office | Sarkarnama

राष्ट्रवादीच्या कार्यालयाला काही काळ जीवदान

संजीव भागवत
गुरुवार, 4 मे 2017

मुंबई : मंत्रालयासमोर उभे राहत असलेल्या मेट्रो स्थानकासाठी मागील दोन आठवड्यापूर्वी वीज, पाणी तोडून कार्यालय हलविण्यासाठी कुठलाही पर्याय न ठेवलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयाला मेट्रोने थोडासा दिलासा दिला आहे. गुरुवारी पुन्हा एकदा मंत्रालयासमोरील असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयाचे वीज, पाणी याची जोडणी मेट्रोने करून दिल्याने पुढील दोन महिने राष्ट्रवादीचा मुक्काम आपल्या जुन्याच कार्यालयात वाढला आहे. 

बेलॉर्ड पिअर येथील ठाकरसी इमारतीत राष्ट्रवादीला कार्यालयासाठी पहिल्या आणि तळमजल्यावर जागा देण्यात आली आहे. मात्र या जागेत अद्याप कोणतीही तयारी मेट्रोने केली नाही. अशा स्थितीतच मागील दोन आठवड्यापूर्वी मेट्रो प्रशासनाने राष्ट्रवादीच्या कार्यालयाची वीज पाणी तोडून ते स्थलांतर करण्याची कार्यवाही सुरू केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यालयाची मोठी अडचण झाली होती.

बेलॉर्ड पिअर येथील कार्यालय तयार नसताना कार्यालयाचे वीज, पाणी अचानक तोडल्याने राष्ट्रवादीकडून हरकत घेण्यात आली होती. त्यामुळे झालेली चूक मान्य करत मेट्रो प्रशासनाने राष्ट्रवादीच्या कार्यालयाची वीज, पाणी जोडून दिले असून त्यासोबत दोन महिन्यात बेलॉर्ड पिअर येथील राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या कार्यालयाची पूर्ण तयारी करून देण्याचे आश्‍वासनही राष्ट्रवादीला देण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीकडून देण्यात आली. 
राष्ट्रवादीची भूमिका नेहमीच विकासाच्या बाजूने राहिलेली आहे. त्यामुळे आम्ही कधीही विरोध केला नाही. मात्र मागील 22 तारखेला आमच्या कार्यालयाची पर्यायी व्यवस्था पूर्ण न करताच आमच्या कार्यालयाचे वीज, पाणी बंद करण्यात आले होते. यामुळे आमची अडचण झाली होती. आता मेट्रो प्रशासनाला आपली चूक झाल्याचे लक्षात आल्याने वीज, पाणी जोडून देत आमचे कार्यालय पुढील दोन महिन्यापर्यंत सुरू ठेवण्यासाठी मुभा दिली आहे. आमच्या या कार्यालयाची मूळ जागा ही साडे नऊ हजार चौरस फुटाची आहे. परंतु आम्हाला देण्यात आलेल्या पर्यायी कार्यालयाची जागा ही त्याहून कमी म्हणजेच दोन मजल्यावरील केवळ 800 चौरस फूट इतकी आहे. आमच्या कार्यालयासाठी आम्ही मेट्रोला प्लॅन दिला असून त्याप्रमाणे कार्यालय तयार करून देण्याचे त्यांनी आश्‍वासनही दिले आहे. आता त्यांना त्यांची चूक लक्षात आली असल्याने येत्या दोन महिन्यात आम्हाला आमच्या प्लॅनप्रमाणे कार्यालय तयार होऊन मिळेल अशी अपेक्षा असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

संबंधित लेख