NCP never allows to curb freedom of expression, says Sharad Pawar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी कधीही सहन करणार नाही - शरद पवार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

महाराष्ट्रातला तरुण लोकशाही रक्षणार्थ व्यक्त होत असेल तर त्याचा आवाज दाबणे चुकीचे असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी महाराष्ट्रातली जनता कधीही सहन करणार नाही, याचे भान सत्ताधारी पक्ष अथवा संबंधित यंत्रणेने ठेवावे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिला.

मुंबई : महाराष्ट्रातला तरुण लोकशाही रक्षणार्थ व्यक्त होत असेल तर त्याचा आवाज दाबणे चुकीचे असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी महाराष्ट्रातली जनता कधीही सहन करणार नाही, याचे भान सत्ताधारी पक्ष अथवा संबंधित यंत्रणेने ठेवावे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिला.

सोशल मिडीयातील नोटीस आलेल्या तरुणांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बैठक घेतली. या बैठकित तरूणांनी घाबरून जावू नये. त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वासही पवार यांनी या तरूणांना दिला.

सरकारच्या ध्येय -धोरणाच्या विरोधात लिखाण करणाऱ्या प्रसिद्धी माध्यम आणि सोशल मीडियातील अनेकांना गेल्या काही महिन्यात पोलीस आणि इतर तपास यंत्रणेकडून नोटिसा बजावण्यात आल्या असून त्याची गंभीर दखल पवार यांनी घेतली. राज्यभरात ज्यांना अशा प्रकारच्या नोटिसा आलेल्या आहेत, त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नसून राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या कायम पाठीशी उभी राहील असा विश्वास यावेळी पवार यांनी दिला.

या वेळी राज्यभरातून पत्रकार, सोशल मीडियावर लिखाण करणारे तरुण पवार यांना भेटले, त्यांच्याशी चर्चा केली. यात मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर येथील पत्रकारांचा समावेश होता. यात प्रामुख्याने पत्रकार ब्रह्मा चट्टे, आशिष मेटे, मानस पगार, विकास गोडगे, शंकर बहिरट, योगेश वगाज, श्रेणिक नरदे, सचिन कुंभार आदींचा सहभाग होता.

संबंधित लेख