NCP Moreshwar Kine loses corporatorship | Sarkarnama

राष्ट्रवादीचे मोरेश्वर किणे  यांचे नगरसेवक पद रद्द

राजेश मोरे 
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

अनाधिकृत बांधकाम प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

ठाणे :    मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर किणे  यांचे नगरसेवक पद ठाणे  महापालिका प्रशासनाने रद्द केले आहे. अनाधिकृत बांधकाम प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंब्य्रातील प्रभाग क्रमांक 31 ड चे नगरसेवक असलेले मोरेश्वर किणे यांच्या विरोधात एका दक्ष नागरीकाने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने निकाल देतांना याची तपासणी करुन पुढील कारवाई करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. 

त्यानुसार ठाणे  महापालिकेने या प्रकरणात तपासणी केली असता त्यांनी मुंब्य्रातील दोन इमारतींमध्ये मोरेश्वर किणो   स्वत: विकासक असल्याचे आढळून आले असून, या इमारती अनाधिकृत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. 

त्यानुसार त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी दिली. राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे पद एवढा तडकाफडकी रद्द झाल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. 

संबंधित लेख