ncp leaders come together | Sarkarnama

वरिष्ठांनी कान टोचल्याने पुणे राष्ट्रवादीत `मिले सूर मेरा तुम्हारा`

ज्ञानेश सावंत
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

पुणे : भाजप सरकारांविरोधात आंदोलनाचा धडाका लावलेल्या पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची चार दिशांना झालेली चार तोंडे आता एकत्र येऊ लागली आहेत. पक्ष संघटनेपासून फटकून वागणारे आणि आपल्याच तोऱ्यात राहणारे नगरसेवक-पदाधिकारीही भलत्यातच उत्साहाने संघटनेच्या कामात उतरले आहेत.

राज्य सरकारच्या "घरपोच' दारुच्या मुद्यावरून राष्ट्रवादीने पुकारलेल्या आंदोलनात गटतट विसरून अनेकजण एकत्र आल्याने या पक्षात आता "मिले सूर मेरा-तुम्हारा'चे समीकरण जुळून आले आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात शहर पातळीवर खांदेपालट होताच संघटनात्मक बांधणीला वेग आला आहे. नवे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी आपली नवी फौज उभी करीत, आंदोलने आणि कार्यक्रमांचा सपाटा लावला. सरकारांविरोधातील मुद्दे उचलून धरत गेल्या महिनाभरात सहा वेळा पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आंदोलनाला सरसकट प्रचंड गर्दी झाल्याचा दावा चेतन यांनी त्या-त्या वेळी केली. मात्र, खरी चर्चा राहिली ती आंदोलनांपासून चार हात लांब राहिलेल्या नगरसेवक-पदाधिकाऱ्यांची!

महापालिकेत झालेल्या आंदोलनातही पक्षाचे सर्व नगरसेवक सहभागी झाले नव्हते. त्यापाठोपाठ झालेल्या पक्षाच्या कंदील मोर्चात गर्दी दिसून आली. परंतु, या गर्दीत हाताच्या बोटावर मोजता येतील, इतक्‍याच नगरसेवक-पदाधिकाऱ्यांचा सहभाग दिसून आला. नगरसेवकांसह पक्षाच्या काही आघाडीच्या प्रमुखांनीही दांडी मारली.

त्यात, चेतन यांच्या नव्या टिममधील पदाधिकारीही आंदोलनाच्या ठिकाणी उशिराने पोचल्याचे कारण मांडण्यात आले. नेमकी वस्तुस्थिती मात्र निराळीच होती. त्यामुळे आंदोलनाला दांडी मारणाऱ्यांची चर्चा पक्ष संघटनेत सुरू झाली. तेव्हाच, वरिष्ठ नेत्यांकडून संबंधितांचे कान टोचण्याची व्यवस्थाही काहीजणांनी करून ठेवल्याचे सांगण्यात आले. त्याचा परिणाम की काय, जंगली महाराज रस्त्यावरील राणी लक्ष्मीबाई चौकात सोमवारी भर उन्हात झालेल्या आंदोलनाला नगरसेवक आणि बहुतांशी आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आर्वजून हजेरी लावल्याचे दिसून आले.

सततची आंदोलने, प्रभागांतील कामे, बैठकांमुळे वेळ देता येत नसल्याचे गाऱ्हाणे मांडणारे नगरसेवकही अगदी वेळेत आंदोलनाला पोचल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे ज्या कार्यकर्त्यांचा शोध घेण्याची वेळ आली होती, तेही आज "राष्ट्रवादी पुन्हा...असे म्हणत, सरकारविरोधात "टाळ' कुटत बसले होते. एकूणच, वरिष्ठ नेत्यांच्या धाकामुळे का होईना पण राष्ट्रवादीत चैतन्य निर्माण होण्याची चिन्हे तूर्तास तरी आहेत. 

संबंधित लेख