NCP leader Jayant Patil vs Devendra fadanvis | Sarkarnama

मुख्यमंत्री महोदय आमदारांची सुटका करा - जयंत पाटील

ब्रह्मा चट्टे : सरकारनामा न्यूज ब्यूरो
शुक्रवार, 9 मार्च 2018

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी पेन ड्राईव्हमधे आमदारांकडे दिलीय. आता लोकांचे आमदारांना फोन येत आहेत. उद्या लोकांच्या रांगा आमदारांच्या घरासमोर लागतील.

मुंबई  : " राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी पेन ड्राईव्हमधे आमदारांकडे दिलीय. आता लोकांचे आमदारांना फोन येत आहेत. उद्या लोकांच्या रांगा आमदारांच्या घरासमोर लागतील. त्यामुळे कर्जमाफीची यादी वेबसाईटवर टाकून मुख्यमंत्री महोदय आमदारांची सुटका करा ," असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केले.

जयंत पाटील म्हणाले, " सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर आम्ही यादी मागितली. म्हणून कर्जमाफीची यादी पेन ड्राईव्हमधे दिलीय. पण त्यामुळे लोकं आमदारांना फोन करत आहे. आमचं नावं यादीत आहे का ? म्हणून विचारतं आहेत. त्यामुळे आता लोकं आमदारांच्या घरासमोर रांग लावतील. त्यामुळे कर्जमाफीची यादी वेबसाईटवर टाकून मुख्यमंत्रीमहोदय आमदारांची सुटका करावी. " 

त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, " पेन ड्राईव्हमध्ये दिलेली  कर्जमाफीची यादी ही बँक निहाय आहे. त्यात एका तालुक्यातील बँकेने दुसऱ्या तालुक्यातील लोकांना कर्ज दिले आहे. ते त्या यादीत दुसऱ्या तालुक्यातील लोकांचे नावे दिसतील त्यामुळे लोकांमध्ये पुन्हा गैरसमज होईल. त्यासाठी कर्जमाफीची यादी साईटवर टाकली नाही.तालुकानिहाय यादी बनवून लवकरात लवकर ती यादी वेबसाईटवर टाकू. त्याचबरोबर ही यादी इंग्रजीत आहे. त्यामुळे ही यादी मराठीत करून लवकरच ते बेवसाईटवर टाकण्यात येईल."

संबंधित लेख