NCP launches frontal taack on Narendra Modi | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

मोदींची आम आदमी के साथ मन की बात, मात्र अदानी - अंबानी के साथ धन की बात  : छगन भुजबळ

राजेश मोरे
शनिवार, 12 जानेवारी 2019

आम आदमी के साथ मन की बात मात्र अदानी - अंबानी के साथ धन की बात असे या सरकारचे नविन नविन फंडे आहेत. -छगन भुजबळ

ठाणे: " पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात  पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत . आता एमडीएचच्या मसालेवाले काकांच्या वया एवढे हे भाव वाढविण्याचे प्रयत्न भाजपाचे सुरु असून या निमित्ताने चहा विकत असलेल्या मोदींनी देश विकू नये ," अशी कडवट टिका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज ठाण्यात केली.

राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने गडकरी रंगायतन समोरील चैाकात आयोजित सभेत ते बोलत होते.

" भाजप सरकारने केवळ फोडा आणि राज्य करा अशी भूमिका घेतली आहे. ओबेसी आरक्षणाच्या  विरोधात पाच पिटीशन  कोर्टात आले आहेत. पण या विषयावर सरकारी वकील काहीच बोलत नाही. भाजप सरकार मराठा विरोधात ओबीसी अशी भांडणे लावण्याची कामे करीत आहे .  या सरकारमधील लोकांनी देवतांच्या जाती काढण्याचे उद्योग सुरु केले आहेत. यांच्या कारभारामूळे भविष्यात देवतांन आरक्षणासाठी भांडण्याची वेळ येईल ,"अशी टिकाही छगन भुजबळ  यावेळी केली.

यावेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते.

" ज्या रिलायंस कंपनीने खेळण्यातील विमान बनविले नाही त्याला राफेलचे विमान बनवायला देत आहेत. मात्र सरकारच्या एच ए एल सारख्या कंपन्यांना  काम देत नाहीत. आम आदमी के साथ मन की बात मात्र अदानी - अंबानी के साथ धन की बात असे या सरकारचे नविन नविन फंडे आहेत. मला का तुरूंगात टाकले मला कळले नाही. आणि ज्यांनी टाकले त्यांनाही कळले नाही असे  भुजबळ यांनी सांगितले.

अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेच्या राज्यात सर्वसामान्य नागरिकाना न्याय मिळणे बंद झाल्याची टिका केली. ते म्हणाले," तेवीस वर्षी बेस्टचा कारभार शिवसेनेकडे आहे. पण त्यांना तेथील कमगारांना न्याय देता आला नही. बेस्टच्या कर्मचाऱयांना जे समाधानी करु शकत नाहीत. ते राज्यातील लोकांना काय समाधान देणार ?. शहरी भागात सात्त्याने लोकं शिवसेना निवडून देतात. एकदा आम्हाला निवडून द्या मग बघा आम्ही काय करतो. यांच्या सारखे खोटे बोलायचे आम्हाला जमत नाही ".

" शिवसेना आणि भाजपा एकाच नाण्याच्या बाजू आहेत. लोकांना झुलवत ठेवायचे आणि काहीच करायचे नाही अशी त्यांनी कारभाराची पद्धत आहे. बाळासाहेब ठाकरे जाऊन किती वर्ष झाले पण बाळासाहेबांचे स्मारक कधी  करणार याचे उत्तर नाही त्यांच्याकडे नाही. पण निवडणूका आल्या की यांना श्री राम प्रभू आठवतात ,"अशी टिका त्यांनी शिवसेनेवर केली.

" गेल्या निवडणूकीत सर्वांना वाटले होते कि मोदी काही तरी वेगळी करतील म्हणून लोकांनी त्यांना मत दिली होतं. मात्र मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडण्याचे काम या सरकारने केलय ,"असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ठाण्यात केला. उद्धव ठाकरेंचं घोडं कुठं अडलय , असा सवाल करत भाजप सरकारच्या कारभारात शिवेसेना पापाची भागिदार असल्याचे त्यांनी सांगितले.

 "शिवसेनेचा दुटप्पी पणा सर्वांनी समजून घेतली पाहिजे. नाणारला सेनेने बाहेर विरोध केला आणि सभागृहात मात्र मुख्यमंत्र्यांनी इशारा करतात एकनाथ शिंदें सह सर्वच मंत्री आमदार सेनेचे आपल्या खुर्चीवर बसल्याचे पाहावयास मिळाले.आज जुनी शिवसेना राहिलेली नाही, सत्तेसाठी लाचार होणारी शिवसेना गुळाच्या ढेपेसारखी भाजपाला चिकटून बसली" असल्याची टिका त्यांनी केली.
 

संबंधित लेख