NCP KANDEEL MORCHA | Sarkarnama

अंधारात नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा... राष्ट्रवादीने सरकारला ठणकावले 

ज्ञानेश सावंत 
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

पुणे: निवडणुकांआधी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा प्रश्‍न विचारत मते जमविलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारने संपूर्ण महाराष्ट्राच अंधारात नेऊन ठेवल्याचा आरोप करीत, राष्ट्रवादी कॉंग्रेसने भारनियमनाविरोधात शनिवारी कंदील मोर्चा काढला. 

लोकांना अंधारात ठेवणाऱ्या या सरकारच्या कारभारावर "प्रकाश' पाडण्याकरिता हा मोर्चा काढला असून, दिवाळीआधी वीज कपात रद्द न केल्यास थेट मंत्र्यांच्या दारातच ठाण मांडू, अशा शब्दांत आंदोलनकर्त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारला ठणकाविले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार बापू पठारे, रवींद्र माळवदकर, नगरसेवक वनराज आंदेकर, प्रदीप गायकवाड, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, नितीन कदम, महिला आघाडीच्या हसीना इनामदार, अर्चना हनमघर, मृणालिनी वाणी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

महागाई, इंधन दरवाढीपाठोपाठ वीज कपात करण्यात आल्याच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी भाजप-शिवसेना सरकारविरोधात घोषणाबाजी केली. नाना पेठेतील संत कबीर चौकातून सुरू झालेल्या मोर्चाचा समारोप रस्ता पेठेतील महावितरणच्या कार्यालयासमोर झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या धोरणाविरोधात तुपे आणि चव्हाण यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. 

तुपे म्हणाले, ""भाजप नेत्यांनी लोकांना खोटी आश्‍वासने देऊन सत्ता मिळविली. ती ताब्यात घेतल्यानंतर फसवणुकीचा सपाटा लावला आहे. ठराविक घटकांच्या तुंबड्या भरण्याकरिताच सरकार सामान्यांवर मात्र महागाई लादत आहे. सत्ताधाऱ्यांना गरिबांची कणव नाही. आपली धोरणे रेटताना सरकार निवडणुकांसाठी पैसा जमवत आहे. आधी वीज दरात वाढ केली आणि पाठोपाठ तिची कपातही सुरू केली आहे. लोकांनी सण कसे साजरे करायचे. ऐन सणासुदीचे दिवसही अंधारात घालवावे लागतात. दोन्ही सरकरांच्या नियोजन शून्य कारभाराचा सर्वच क्षेत्र अडचणीत आले आहेत. त्यात सामान्य भरडला जात आहे.'' 

चव्हण म्हणाल्या, ""सरकारला भानावर आणण्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करू. ज्यामुळे सामान्यांना न्याय मिळेल.'' 

संबंधित लेख