ncp halabol in w. maharashtra | Sarkarnama

2 ते 12 एप्रिलदरम्यान राष्ट्रवादीचा आता पश्‍चिम महाराष्ट्रात हल्लाबोल 

तुषार खरात 
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई ः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने हल्लाबोल मोर्चाचा पुढील टप्पा आता पश्‍चिम महाराष्ट्रात आयोजित करण्यात येणार आहे. येत्या 2 ते 12 एप्रिल या कालावधीत हा मोर्चा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा व पुणे या जिल्ह्यांत होणार आहे. कोल्हापूरच्या चंदगड येथून मोर्चाला सुरूवात होईल, आणि पुण्याच्या मावळमध्ये मोर्चा समाप्त होईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी "सरकारनामा'ला दिली. 

शेतकऱ्यांची रखडलेली कर्जमाफी, बेरोजगारी, कायम दुष्काळी भागातील प्रश्‍न, दुधाला मिळणारा अत्यल्प भाव, हमीभाव इत्यादी प्रश्‍नांवर या हल्लाबोल मोर्चातून जनजागृती केली जाईल. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीचे तळागाळातील कार्यकर्ते जोरदार कामाला लागले आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच लोकप्रतिनिधी त्यासाठी तयारीत गुंतले आहेत. हसन मुश्रीफ, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, विजय मोहिते पाटील, दिलीप सोपल यांच्यासह सगळ्या लोकप्रतिनिधींनी यासाठी कंबर कसल्याचे सूत्रांनी 
सांगितले. 

संबंधित लेख