ncp eighat mp will be elected shashikant shinde | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

राष्ट्रवादीचे आठ खासदार निवडून येतील : शशिकांत शिंदेंचा दावा 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

सातारा : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससह समविचारी पक्षाची आघाडी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे आठ खासदार निवडून येतील. साताऱ्याची जागा शंभर टक्के विजयी होणार आहे. तसेच राष्ट्रवादीचे साताऱ्यातील सर्व आमदारही चांगल्या मतांनी निवडुन येतील, असा विश्‍वास राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद आणि कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. 

सातारा शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 2019 च्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस व समविचारी पक्षांची आघाडी होणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या आठ लोकसभेच्या जागा 100 टक्के निवडून येतील. सातारा आणि कोल्हापुरची जागा निवडून येणार ही काळया दगडावरची रेघ आहे.

विधानसभेलाही मला कोरेगावमधून कसलीच अडचण नाही. नुकत्याच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरेगावात झालेल्या मेळाव्यात वरिष्ठांनी गर्दी पाहून माझे कौतुक केले. तसेच तुम्हालाच लोकसभेला उभे करु या, असे चेष्टेने विचारले. वाईत मकरंद पाटील यांच्यासाठीही चांगले वातावरण आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाळासाहेब पाटील यांचेही मतदारसंघ सुरक्षित आहेत. फलटणचे दीपक चव्हाण यांना कसलाही त्रास नाही. तेच पुन्हा रिपीट होणार आहेत. त्यामुळे सातारा जिह्यात पुन्हा राष्ट्रवादीच असणार आहे, असा दावा त्यांनी केला. 

संबंधित लेख